Monday 2 September 2013

पालक पनीर

पालक पनीर



साहित्य : एक ताजी पालक जुडी,एक ग्लास पाणी,५० ग्राम ताजे पनीर,एक मोठा बारीक चिरलेला कांदा,एकछोटा चमचा धने,एक चमचाभर आले लसूण पेस्ट,एक छोटा चमचा गरम मसाला ,चवीप्रमाणे एक-दोन हिरव्या मिरचयांचे तुकडे, एक छोटा चमचा लिंबाचा रस,एक छोटा चमचा हळद, एक छोटा चमचा जिरे पूड, एक छोटा चमचा धने पूड, एक छोटा चमचा आमचूर पूड,एक मोठा चमचा दही,चवीप्रमाणे मीठ,दोन मोठे चमचे तेल,एक चमचा बेसन किंवा तांदळाचे पीठ.  

कृती : प्रथम पालकाची पाने निवडून व धुवून घ्यावीत.एका पातेल्यात ग्लासभर पाणी उकळायला ठेवावे. उकळी आल्यावर त्यात पालकाची पाने,चिमूटभर मीठ व लिंबाचा रस घालून दहा मिनिटे शिजवू द्यावे.त्यानंतर उरलेल्या पाण्यासाकाट शिजलेला पालक,धने व हिरव्या मिरचयांचे तुकडे घालून मिक्सरमधून बारीक वाटून घ्यावा.

पनीरचे चौकोनी तुकडे करून ठेवावेत . एक चमचाभर बेसनाच्या किंवा तांदळाच्या पिठात दोन चमचे पाणी घालून  त्या मिश्रणात पनीरचे तुकडे घोळवून घेऊन थोड्याश्या तेलात पनीर शॅलो फ्राय करून घ्या.
एका पातेल्यात तेल गरम करून त्यात आलं-लसूण पेस्ट घालावी. खमंग वास सुटला कि कांदा गुलाबी रंगावर परतून घ्यावा. मग धने-जिरे पूड ,गरम मसाला आणि छोटा चमचा हळद घालून परतावे.नंतर त्यात वाटलेला पालक घालावा. आमचूर घालून एक उकळी काढावी व मग शेवटी दही घालून एनआयटी ढवळावे व जरूर वाटल्यास थोडे पाणी घालावे.
प्रत्यक्ष सर्व्ह करायच्या ५-१० मिनिटे आधी पनीर घालावे.

No comments:

Post a Comment