Search This Blog

Monday, 16 September 2013

मटार उसळ

" मटार उसळ  "



साहित्य :  तीन वाट्या ताजे हिरवे मटारचे दाणे, दोन माध्यम उकडलेले बटाटे,फोडणीचे सामान (पाच  चमचे तेल,एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा लाल तिखट(चवीप्रमाणे जास्त घातले तरी चालेल) , दोन चमचे गोडा मसाला, दोन चमचे गरम मसाला, हळद व हिंग), आलं-लसूण पेस्ट, कढीपत्ता,किसून भाजलेलं सुकं खोबरं, ४ चमचे दाण्याचं कूट,मीठ व गुळाचा खडा

कृती : एका मोठ्या स्टीलच्या पातेल्यात -६ वाट्या पाणी तापत ठेवा,  दुसर्‍या एका मोठ्या जाड बुडाच्या  कल्हईच्या पितळेच्या पातेल्यात फोडणीसाठी तेल तापत ठेवा. तेल तापल्यावर त्यात मोहरी टाकू ती तडतडायला लागल्यावर त्यात आले-लसूणाची पेस्ट, कढीपत्ता, लाल तिखट, गोडा मसाला, गरम मसाला, हळद व हिंग (याच क्रमाने) टाकुन नंतर  त्यावर मटारचे दाणे व थोडे मीठ टाकून (अगदी थोडेसेच) परतून घेऊ, मग त्यात बटाट्याच्या फोडी, ४ चमचे दाण्याचं कूट,खोबरं, गूळ व उकळतं पाणी टाकू पाण्याला उकळी फुटली की गॅस बारीक करून, झाकण ठेऊन ५ मिनिटं उकळत ठेऊ.मिनिटांनंतर मटार शिजले का ते व चव बघावी व आवश्यकतेप्रमाणे त्यात थोडे मीठ व तिखट टाकावे॰ खाताना ज्याचे त्याने आवडीप्रमाणे लिंबू पिळावे.





No comments:

Post a Comment