Search This Blog

Friday, 6 September 2013

मटाराच्या करंज्या

मटाराच्या करंज्या 


साहित्य : मटार २ वाट्या,आले,लसूण,जीरेपूड,धनेपूड,हिरव्या मिरच्या,मीठ,खवलेला ओल्या नारळाचा चव,फोडणीचे साहित्य हळद,हिंग,मोहोरी,जिरे,तळणीसाठी तेल,पारीसाठी कणीक व थोडासा बारीक रवा.

कृती : प्रथम प्रेशर कुकरमधून मटार तीन शिट्या देऊम शिजवून घ्या. शिजवलेला मटार कुकरमधून काढल्यावर त्यात आले,लसूण,हिरव्यामिरच्या,कोथिंबीर,जिरे-धनेपूड ,ओल्या खोबर्‍याचा चव व मीठ घालून वाटलेला मसाला चांगला कुस्करून व मिसळून घ्या.वर खमंग तेलाची फोडणी घाला व एकदा कढईत घालून परतून घ्या. हे झाले कराजीचे सारण. आता  पारीसाठी कणीक घेऊन त्यात मीठ, बारीक रवा व कडकडीत तेलाचे मोहन घालून कोरडे मिसळून घ्या.नंतर हवे तसे थोडे थोडे पाणी घालत घट्टसर कणीक चांगली मळून झाकून ठेवा. अर्ध्या तासाने त्याचे बारीक घोळे करून घेऊन पातळ पुर्‍या  लाटा व त्यात मटाराचे आधी त्तयार करून ठेवलेले सारण भरून करंजी करून घ्या. गॅसवर एका कढईत पुर्‍या तळण्यासाठी तेल तापत ठेवा.तेल चांगले कडकडीत तापल्यावर त्यात एका वेळी ४-५ करंज्या टाकून दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर तळून घ्या व एका चाळणीत बटर पेपर घालून त्यावर काढून घ्या.
डिशमधून गरम गराम करंज्या चटणीबरोबर सर्व्ह करा.  




No comments:

Post a Comment