Monday 23 January 2017

पेरूचे लोणचे



पेरूचे लोणचे

साहित्य : दोन पूर्ण पिकलेले कमी किंवा  बिन बियांचे पेरु,एक टेबलस्पून तेल,एक चमचा मोहरी,एक छोटा चमचा हिंग,एक चमचा मेथीचे दाणे,एक टेबलस्पून लाल मिरचीचे तिखट,एक चमचा गुळाचा कीस,एक टेबलस्पून लिंबाचा रस.
कृती : पेरूच्या वरचे साल व असल्याच तर आणतील बिया काढून टाका व छोटया फोडी चिरून घ्या. गॅसवर एका पॅनमध्ये  फोडणीसाठी तेल गरम करुन त्यांत मोहरी ,हिंग ,मेथी दाणे ,हळद ,तिखट टाकुण फोडणी करून घ्या आणि लगेचच पेरू च्या फोडींवर घाला व थोडे पाणी टाकून फोडी शिजू द्या ,मग चवीला मीठ ,गूळ व लिंबाचा रस घालून एक वाफ काढा.

कढी पकोडा



कढी पकोडा

साहित्य  : पकोड्यांसाठी : दोन वाट्या बेसन पीठ,चवीनुसार ४-५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,एक लहान चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ ,मोहन म्हणून दोन टेबलस्पून तेल,पकोडे तळण्यासाठी गरजेनुसार वेगळं तेल.
कढीसाठी साहित्य  : ५-६ कप आंबट दही,५-६ त्बलस्पून बेसन पीठ,फोडणीसाठी एक चमचा तेल,एक छोटा चमचा मोहरी,अर्धा छोटा चमचा हळदपूड,एक छोटा चमचा जिरे,एक चमचा आले-हिरवी मिरची यांची पेस्ट,चिमूटभर हिंग,चवीनुसार साखर व मीठ.
कढीला वरून द्यायच्या फोडणीसाठी : एक चमचा चमचा तेल,दोन अख्ख्या सुक्या लाल मिरच्या.
कृती : कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हॅण्ड मिक्सरने (ब्लेंडरने) एकजीव करुन घ्या.
आता गॅसवर एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये जिरे,मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं-हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि हळद घाला.
मग दही-बेसनाचं मिश्रण आणि मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्रण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
दुसरीकदे पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा आणि ते व्यवस्थित फेटा.
नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा, लाल तिखट, मीठ आणि गरम तेल घाला. पुन्हा एकवार फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तळून ठेवा.
शिजलेल्या कढीमध्ये हे पकोडे टाका आणि ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये कढी ओता.
आता गॅसवर एका कढल्यामध्ये कढीला वरून द्यायच्या फोडणीसाठी एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालून एक मिनिट परता आणि ही फोडणी कढीवर ओता. वरून फोडणी घातल्यानंतर या पदार्थाला एक वेगळंच रूप मिळतं व अङ्कोखा आस्वादही येतो.

Saturday 14 January 2017

मेथी दुधी मसाला भाजी



मेथी दुधी मसाला भाजी


साहित्य: एक जुडी मेथी, एक मध्यम दुधी भोपळा, तीन कांदे, दोन टोमॅटो,दहा -बारा लसणाच्या पाकळ्या, बोटभर आल्याचा तुकडा , एक चमचा गरम मसाला,एक चमचा लाल तिखट, अर्धी वाटी फ्रेश क्रीम, अर्धी वाटी दही, मीठ,तेल, हळद.
कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. धुवून व चिरून घ्या, दुधी भोपळ्याची साले काढून घेऊन त्याच्या  फोडी करून घ्या,. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्या, कांदे उभे चिरून घ्या, टोमॅटो बारीक चिरुन घ्या, लसणाच्या पाकळ्या सोलून घ्या, आल्यावरची साले काढून घ्या,गॅसवर एका पातेल्यात दोन चमचे तेल तापवून त्या तेलात कांदा टाकावा.तो लालसर रंगावर परतल्यावर त्यात लसूण, आले चिरून टाकावे. टोमॅटो घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. डिशमध्ये गार करायला ठेवावे. परत पातेल्यात चार चमचे तेल तापत ठेवावे. चिरलेली मेथी तेलावर परतावी. मेथी चागली परतल्यावर हळद ,तिखट घालावे. परतलेले कांदे,लसून,आले, टोमाटो बारीक वाटून घ्यावे. परतलेल्या मेथीमध्ये वाटप घालावे. फ्रेश क्रीम,दही,गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण परतावे व त्यात वाफवलेल्या दुधी भोपळ्याच्या फोडी मिसळा. तेल सुटेपर्यंत भाजी परतावी.
 ही भाजी पोळीबरोबर गरमागरम खायला द्या,. 
टीप: दुधी भोपळा न खाणारी मुलेही आवडीने खातात.