Monday 31 October 2022

अन्नावरचा भारतीय संस्कार :

 कॉपी पेस्ट

अन्नावरचा भारतीय संस्कार :
मोड आलेली कडधान्ये म्हणजे विष नव्हे. पण पाणी मुरल्याने पचायला जड असतात. कच्ची तर अजिबात नको. शिजवून खायला हरकत नाही.
शेवटी भारतीय संस्कार महत्वाचा !
आता हेच पहा ना.
तांदळाचा भात बनवताना संस्कार महत्वाचा !
कुकरमधे भात बनवला, तर त्यात चिकटपणा तयार होतो. पाणी भातात मुरते. जिथे पाणी मुरते तिथे गडबड असतेच ना !
तांदळाच्या दुप्पट पाणी घालून कुकरमधे २५० सेंटीग्रेडला पंधरा ते वीस मिनीट शिजवला, तर त्यातील जीवनसत्वे जिवंत रहातील ?
एका बाजूने गॅस वाचेल, त्यापेक्षा जास्ती रक्कम डाॅक्टरना कायमस्वरूपी द्यावी लागते. अग्निसंस्कार चुकीचा झाला ना !
कसा ?
आपली भात करण्याची पारंपारीक पद्धत काय आहे ? त्यातील तापमान अभ्यासूया.
प्रथम तांदळाच्या १६ पट पाणी, १०० सेंटीग्रेडला ऊकळवून घेतले, आधीच रोवळीमधे धुवुन घेतलेले तांदुळ त्यात ओतले, आठ ते दहा मिनिटे उकळत्या पाण्यात तांदुळ शिजवून, एक शीत काढून आतपर्यंत शिजला हे पाहून, जास्तीचे पाणी काढण्यासाठी, चाळणीवर हा भात ओतावा. शिजलेले पाणी, म्हणजे पेज, काढून टाकावी. आणि भात पुनः पातेल्यात ओतून फक्त ५० ते ६० सेंटीग्रेडला दहा मिनिटे झाकण टाकून ठेवावा.
मस्त फुलतो.
वेगळी केलेली पेज प्यायची हं. पोषक अंश ( आजच्या भाषेत, कार्बोहायड्रेटस् ) त्याच्यातच आहेत ना !
आता या पद्धतीच्या भातात भात आणि पेज मिळून सगळी जीवनसत्वे शाबूत असतील ना !
अग्नीचा संस्कार यथायोग्य झाल्याने, आणि पाणी काढून टाकल्याने, भात पचायला हलका. आणि पेजही पचायला हलकी.
तांदळाच्या १६ पट पाणी, ८ पट पाणी, ४ पट पाणी आणि दुप्पट पाणी घालून केलेल्या भाताला अनुक्रमे मंड, पेया, विलेपी आणि ओदन अशी नावे आहेत. म्हणजेच निवळ, पेज, आटवल आणि भात.
अशा पेज काढलेल्या भाताने पोट अजिबात सुटत नाही. आणि ( क्लेद वाढवणारा चिकट भाग योग्य वेळी वेगळा केल्याने, साखरही वाढत नाही.)
कोकणात सगळेच जण हाऽऽ एवढाऽऽऽ भात जेवतात. कोणाचे पोट सुटलेले नाही बघितलेले.
पण कुकरचा भात सुरू केल्यापासून पोटं सुटायला लागलीत आणि रक्तातील साखर देखील वाढायला लागली. हे पण दिसायला लागलेय.
आता सांगा, कुकरच्या भातात आणि पेज काढून केलेल्या भातात जमिन अस्मानाचा फरक असेल की नाही ?
हा आहे अन्नावरच्या अग्नीचा भारतीय संस्कार...
लेखक माहित नाही, (एका ग्रुप वरून कॉपी केलेली पोस्ट आहे)

Sunday 9 October 2022

झटपट प्याज डोसा (Onion Dosa)

 

 

 

 

झटपट प्याज डोसा

साहित्य : एक वाटी रवा,एक वाटी तांदूळाची  पिठी,एक वाटी मैदा,एक चमचा जिरे,४-५ काळी मिरी,एक मोठा कांदा – बारीक चिरून,एक हिरवी मिरची – बारीक चिरून,८-१० कढी पत्त्याची पाने,चवीनुसार मीठ,दोन टेबलस्पून तेल.

कृती : एका बाऊलमध्ये रवा, तांदूळाची  पिठी, मैदा,मीठ  मिक्स करून घ्या व त्यात पाणी घालून डोश्यांसार्खे सरबरीत पीठ भिजवून घ्या. आता या पिठात हिरवी मिरची, कढी पत्त्याची पाने व काळी मिरी घालून डावाने नीट ढवळून मिक्स करा. पीठ जर जास्त दाट किंवा घट्ट आहे असे वाटले तर थोडे पाणी घालून पीठ डोसे घालण्या इतपत सरबरीत बनवून घ्या.

गॅसवर एक  नॉन स्टिक तवा किंवा डोसा तवा गरम करा व त्यावर थोडेसे पाणी शिपडा. तवा सुकला की त्यावर एका वाटीने डोशाचे पीठ घालून वाटीच्या बुडाने सगळीकडे गोलाकार पसरा. त्यावर बारीक चिरलेला कांदा पसरा व चमच्याने डोश्यावर मध्यभागी आणि कडेने सगळीकडे तेल सोडा व मंद आंचेवर डोसा शिजू द्या. डोसा शिजून कडेने कुरकुरीत झाला की एका उलथण्याने कडेने तव्यापासून सोडवत जाऊन डोसा तव्यावरून एका प्लेट मध्ये काढून घ्या.

याच तर्‍हेने उर्वरित डोसे बनवा.

ओल्या नारळाची चटणी व सांबार सोबत सर्व्ह करा.

 


 

Friday 7 October 2022

गव्हाचे सत्व

 

गव्हाचे सत्व 

 

गहू  दोन दिवस पाण्यात भिजवून तिसऱ्या दिवशी मिक्सरमध्ये फिरवून घ्यावे.खूप बारीक नको. जास्त पाणी घालून हाताने दाबून चोथा वेगळा करावा. पाणी गाळून सेट होऊ द्यावे. नंतर वरचे पाणी काढून घट्ट चीक  दोन दिवस उन्हात वळवावा. 

त्याची पावडर करून ठेवावी. 

वर्षभर कॉर्नफ्लोर ला पर्याय  म्हणून वापरू शकतो. 

याचा वापर करून केलेले कटलेट कॉर्नफ्लोर वापरुन केलेल्या कटलेटपेक्षा जास्त क्रिस्पी होतात.


Monday 19 September 2022

झटपट कांद्याची झणझणीत चटणी

 


झटपट कांद्याची झणझणीत चटणी

 

रोज जेवणामध्ये किंवा डब्यात जर  तेच-तेच खाऊन कंटाळला असाल तरबदल म्हणून  घरच्या घरी तयार करा कांद्याची झणझणीत चटणी

साहित्य : दोन मोठ्या आकाराचे कांदे, चवीनुसार ४-५  लाल मिरच्या, एक चमचा चिंचेची पेस्ट, चार चमचे तेल, तीन चमचे मोहरी, अर्धा चमचा उडदाची डाळ, कढीपत्ता, चिमूटभर हिंग, मीठ चवीनुसार.

कृती :

कांदा बारीक चिरून घ्या . एका कढईमध्ये दोन चमचे तेल गरम करा. त्यामध्ये कांदा चांगला भाजून घ्या. त्यात लाल मिरची टाकून भाजून घ्या. त्यानंतर यामध्ये चिंचेची पेस्ट टाकून परतून घ्या. थंड झाल्यानंतर कांद्याचे मिश्रण बारीक वाटून घ्या. आता एका कढल्यात दोन चमचे तेल गरम करा. त्यात मोहरी, उडदाची डाळ, ५-७  मेथीचे दाणे, कढीपत्ता, हिंग आणि मीठ टाकून तडका तयार करा आणि  तो चटणीवर टाकून सर्व्ह करा.

Sunday 21 August 2022

नासी केराबू (Nasi Kerabu) निळ्या गोकर्णीच्या फुलांचा फ्राइड राईस

 

नासी केराबू (Nasi Kerabu)

निळ्या गोकर्णीच्या फुलांचा फ्राइड राईस 

 




नासी केराबू ही एक  मलेशियन पारंपरिक निळ्या रंगाच्या फ्राइड-राईसची  (भाताची)  लोकप्रिय डिश आहे.

भात शिजवतांनाच त्यात तांदूळ व पाण्या सोबत निळ्या  गोकर्णीच्या फुलांच्या पाकळ्यांचा वापर केला जातो. निळ्या गोकर्णीच्या पाकळ्यांमुळे भाताला उत्तम निळारंग व स्वाद येतो.

नंतर हा शिजवलेला निळ्या रंगाचा  भात एका परातीत काढून घेऊन हाताने मोकळा करून ठेवतात. दुसरीकडे गॅसवर एका पॅन मध्ये फोडणीसाठी तेल+तुप गरम करून घेऊन त्यात  आले-लसुणाची पेस्ट,जिरे,हिरवी मिरची,कढी पत्त्यांची पाने,कोथिंबीर,पुदिना व मीठ यांचे मिक्सरवर केलेले वाटण घालून थोडेसे परतून घेऊन नंतर त्यात तो मोकळा केलेला भात घालून चांगले परतून घेतात.

सॅलड व उभी चिरलेली कोबीची पाने यांनी गार्निश करून सर्व्ह करा.

 

Tuesday 14 June 2022

स्वयंपाक घरातील उपयुक्त टीप :

 स्वयंपाक घरातील उपयुक्त   टीप :


चकल्या, शेवेचा घाणा, वडे,भजी,पुऱ्या,पापड,शंकरपाळी, असे कोणतेही तळण काढतांना एका परातीत पातळ पोहे घेऊन त्यावर हे तळण काढावे .
त्यातील अतिरिक्त तेल पोहे शोषून घेतात आणि पदार्थ तेलकट होत नाही.

नंतर हे तेलयुक्त पोहे खमंग भाजून त्याचा चिवडा करता येतो.

Monday 13 June 2022

फ्रिजचा वास जाण्यासाठी काही उपाय

 

फ्रिजचा वास जाण्यासाठी काही उपाय

फ्रीज स्वच्छ, पुसून ,सुकवून घेऊन नंतर फ्रीजमध्ये सगळे अन्न झाकून ठेवले तरीही एक वेगळाच उग्र नकोसा वास फ्रीजमध्ये येतो. दूध फ्रीजमध्ये ठेवलं की त्या दुधाचा चहा पिऊ नये इतका त्या फ्रिजचा वास दुधाला येतो.. अशावेळी खालील पैकी एक उपाय करा.

१.     १. फ्रिजमध्ये कायमस्वरूपी दोन लाकडी कोळसे ठेवावेत , कुठलाही उग्र वास टिकत नाही.

२.    २.  एका वाटीत खायचा सोडा घालून ती वाटी उघडीच फ्रिज मध्ये ठेवा. वास जाईल.

३.    ३.  फ्रिज ऑटोमॅटिक डिफ्राॅस्टवाला असेल तर  बटन दाबून डिफ्राॅस्ट करावा लागतो.

(बटन दाबून डिफ्राॅस्ट करावा लागत असेल तर फ्रिजच्या पाठीमागे खालील बाजूस जे पाणी साठते ते काढून घ्यावे लागते. त्याचा देखील वास येऊ शकतो)

४.    ४.  वर्तमानपत्राचा कागद थोडासा भिजवून त्याचा गोळा करून ठेऊन द्या. आज ठेवलेला पेपर दुसऱ्या दिवशी टाकून द्या असे चार पाच दिवस करा.

५.     ५. एक वाटी पाण्यात व्हिनेगर आणि लिंबू रस मिसळून ठेवून द्या...हळूहळू वास कमी होईल व जाईल.

६.    ६.  लिंबाचे दोन भाग कापून ते ठेवा फ्रिजमधे.सगळा वास निघून जाईल.

७.     ७. फ्रिजमध्ये दूध सांडले आसेल तर वास येतो. त्यासाठी  पाणी व विम लिक्वीड लाऊन फ्रीज स्वच्छ पुसून काढा.

 

Friday 3 June 2022

तांदळाच्या दिवशी,निवगर्‍या

 तांदळाच्या दिवशी,निवगर्या



रेसिपी : गॅसवर एका पातेल्यात एक कप पाणी उकळत ठेऊन त्यात चवीनुसार मीठ
व चिमुटभर हिंग घालावा. त्यात एक वाटलेली मिरची ,लिरेपूड आणि तीळ
घालावेत व पाव कप ताक घालावे. पाण्याला उकळी आली की त्यात एक कप
तांदळचे पीठ घालावे व उकड काढावी.
तेलाचा हात लावुन, परातीमध्ये उकड मळुन घ्यावी.
मग त्या उकडीचे पेढ्यासारखे चपटे गोळे करुन त्यात गोलाकार खळगा करावा आणि त्याला वाटीप्रमाणे आकार द्यावा. कुकरमधे प्रेशर ने देतादहा मिनिटे उकडुन घ्याव्या.
वरुन पगलु जिरे मोहरीची फ़ोडणी करुन ओतावी, आणि ओल्या खोबर्याच्याहिरव्या चटणीबरोबर खाव्यात.
खरे तर तशी चटणीची गरज नसते, पण चटणीबरोबर खूप छान लागतात.

Sunday 29 May 2022

भाताच्या चिकोड्या / सांडगे

भाताच्या चिकोड्या / सांडगे





शिळा / ताजा भात थोडंसं दूध घालून मिक्सर मधून बारीक करून घ्यायचा. चमच्याने ओतून पसरता येईल इतपत पातळ हवं.
तो भात खुप जास्त पातळ न करता शिजतानांच त्यात साजूक तूप, हिरवी मिर्ची, थोडा ओवा,थोडे जिरे,तीळ कुटून घाला,चिरलेली कोथिंबीर व सैंधव मीठ घालून आणि थोडे दूध घालून हाताने बारीक कुस्करून प्लॅस्टिक पेपर वर चमच्याने सांडगे /चिकोड्या घालून थोडे पसरायचे.
साबुदाणा किंवा मुग वडे फुलतात तसे मस्त फुलतात व खुसखुशीत आणि चविष्ट होतात.
कडक उन्हात दोन तीन दिवस वाळवावे.
चिकोड्या / सांडगे तळायला तयार.
छान तळले जातात आणि फुलतात .

Sunday 16 January 2022

ओल्या नाराळाची कढी

 

ओल्या नाराळाची कढी



साहित्य व कृती : खोवलेला ओल्या  नारळाचा चव , एक छोटा कांदा, आलं-लसूण, कोथिंबीर ,जिरं एकत्र करून त्याच वाटण करून ठेवा. तापलेल्या तेलात कढीपत्ता ,मोहरी ,हिरवी मिरची, हिंगाची फोडणी देवून ते वाटण त्यात घाला. छान परतून झालं की बेसन लावलेलं ताक घालून चवी प्रमाणे मिठ व चवीसाठी किमूटभर साखर  घाला मस्त उकळल्या नंतर चिरलेली कोथिंबीर घाला.

Wednesday 5 January 2022

मसाला इडल्या

 मसाला इडल्या




इडलीचे पीठ उरले होते.
एक हिरवी मिरची, चार श्रीलंकन पालकची पाने,चार केनाची पाने,एक ओव्याचे पान,दोन मायाळूची पाने,पुदिना, कोथिंबीर, लसूण ,आलं आणि थोडेसे मीठ घालून मिक्सरवर चटणी बनवून ती त्या पिठात केली आणि त्याच्या इडल्या केल्या.
कोणत्याही तोंडीलावण्याशिवाय खाता आल्या,कारण उत्तम चव.
भरपेट नाश्ता झाला …!