Tuesday 26 October 2021

भारतीय स्वयंपाकात पदार्थांची रुची व स्वाद वाढवण्यासाठी वापरले जाणारे विविध मसाल्याचे पदार्थ

 

भारतीय स्वयंपाकात पदार्थांची रुची व स्वाद वाढवण्यासाठी वापरले जाणारे विविध मसाल्याचे पदार्थ




१.      जिरे

२.      शहाजिरे

३.      मोहरी/ मोहरीची डाळ

४.      हिंग (खडा / पावडर)

५.      हळद /हळकुंड

६.      हिरवे वेलदोडे

७.      जायफळ

८.      मायफळ

९.      मसाला वेलदोडे 

१०. तमालपत्र

११. जायपत्री

१२. त्रिफळ / तिरफळ

१३.  दालचीनी

१४.  लवंग

१५. लाल मिरची   (संकेश्वरी / ब्याडगी / काश्मिरी)

१६.  लाल तिखट

१७.  बडीशेप

१८.  दगड फूल

१९.  बादल फूल / चक्री फूल

२०.  नागकेशर

२१.  खसखस

२२.  गोटा खोबरे

२३. ओल्या नारळाचे खोबरे

२४.  धने

२५.  पांढरे तिळ

२६.  कांदा

२७.  लसूण

२८.  आले

२९.  सुंठ

३०.  मेथ्या

३१.  बारीक मीठ /खडे मीठ

३२. पुदिना

३३. कोथिंबीर

३४. लिंबू

३५. आमसुल

३६. चिंच

३७.  गार्सिआ कंबोगिया (आंबट फळाची पावडर)

३८.  केशर

Saturday 23 October 2021

शिंगाडयाच्या शेवयांचा उपमा (उपासाचा)

 

शिंगाडयाच्या शेवयांचा उपमा (उपासाचा)



साहित्य :  एक वाटी शिंगाडयाच्या शेवया , चार चमचे साजूक तूप, चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्यांचे मोठाले तुकडे,अर्धा चमचा आल्याचा कीस, एक चमचाभर लिंबाचा रस, चवीनुसार मीठ,चवीपुरती साखर,काजूचे तुकडे, शेंगदाण्याचे कूट , सजावटीसाठी ओलं खोबरं , चार वाट्या पाणी

 

कृती : आगोदर प्रथम गॅसवर एका पॅनमसध्ये साजूक तुपावर  शिंगाडयाच्या शेवया भाजून घ्या. आता गॅसवर एका पातेल्यात चिमुटभर मीठ घालून चार वाट्या पाणी उकळायला ठेवावं, पाणी खळखळून उकळलं की त्यात भाजून घेतलेल्या शिंगाडयाच्या शेवया टाकव्या. शेवया शिजल्या की चाळणीतून पाणी काढून निथळून घ्याव्यात.

 आता गॅसवर एका कढाईत फोडणीसाठी तूप गरम करून घेऊन त्यात जिरं,आल्याचा कीस, मिरच्या घालून थोडं परतल्यावर त्यात शिजवून निथळत ठेवलेल्या शिंगाडयाच्या शेवया घालाव्यात व पुन्हा एकदा परतावे. मग मीठ , साखर , लिंबूरस,शेंगदाण्याचे कूट  व काजुचे  तुकडे घालून परतून घेऊन कढईवर झाकण ठेऊन व गॅस मंद करून एक वाफ काढून घ्यावी व  गॅस लगेच बंद करावा.

सर्व्ह करतेवेळी वरून खोबर्याचा चव भुरभुरून हा शिंगाड्याच्या शेवयांचा उपमा सर्व्ह करा.

Wednesday 20 October 2021

पेंडपाला ( एक खास सोलापुरी पदार्थ )

 

पेंडपाला ( एक खास सोलापुरी पदार्थ ) 

 


साहित्य : एक वाटी हरभर्‍याची डाळ ,अर्धी वाटी तुरीची डाळ , अर्धी वाटी गावारीच्या शेंगा (तोडून)दोन चमचे मेथीचे दाणे चवीनुसार दीड ते दोन चमचे लाल मिरचीचे तिखट,छोटा चमचा हळद,दोन चमचे कारळे तीळ , ४-५ लसणाच्या पाकळ्या (ठेचून) , फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,मोहरी , चिमूटभर हिंग चवीनुसार मीठ.

भाजीवर वरुन घ्यायच्या फोडणीसाठी दोन डाव तेल,१५-१६ लसणाच्या पाकळ्या (बारीक चिरून) , ५-६ लाल सुकक्या मिरच्या,चिमूटभर हळद  व हिंग

कृती : सुरवातीला दोन्ही डाळी व मेथीचे दाणे एकत्र स्वच्छ धुवून घ्या. कुकरच्या भांड्यात घालून त्यात बेताचं पाणी घाला. साधारणपणे २ ते अडीच वाट्या पाणी पुरे होईल. त्यात गवारीचे मोडलेले तुकडे घाला. कुकरला शिजवून घ्या. तीन शिट्या पुरे होतील. चणा डाळ पूर्ण राहिली पाहिजे, मोडता कामा नये.आता शिजवलेली डाळ हलक्या हातानं एकत्र करा. डाळीचे दाणे दिसायला हवेत.

दुसरीकडे कढईत तेल गरम करा. तेल तापलं की मोहरी घाला. मोहरी तडतडली की हिंग घाला. त्यातच पाठोपाठ हळद आणि लाल तिखट घाला. लगेचच शिजलेली डाळ घाला. नीट हलवून घ्या.नंतर त्यात मीठ, काळा मसाला आणि कारळाची पूड घाला. परत हलवून घ्या. मध्यम आचेवर उकळी येऊ द्या. उकळी आली की गॅस बंद करा. पेंडभाजी तयार आहे. पेंडभाजीवर वरून लसणाची खमंग फोडणी घालून खातात.

वरून घालण्यासाठी  लसणाची फोडणी : गॅसवर एका काढल्यात फोडणीसाठी तेल कडकडीत गरम करुण घेऊन त्यात मोहरी घालून तडतडू द्या.

मोहरी छान तडतडली की त्यात लसणाचे बारीक चिरलेले तुकडे घाला. ते चांगले लाल, कुरकुरीत होऊ द्या.मग त्यात सुक्या लाल मिरच्यांचे तुकडे घाला. मिरच्या परतल्या की चिमूटभर हिंग आणि चिमूटभर हळद घाला आणि गॅस बंद करा.

पेंडपाल्याची भाजी सर्व्ह करतेवेळी ताटात पेंडपाला भाजी वाढा आणि त्यावर तयार केलेली लसणाची खमंग फोडणी घाला. बरोबर गरमा-गरम ज्वारीची भाकरी त्यावर लोण्याचा गोळा,लसणाची चटणी  आणि ताजं ताक द्या.

Saturday 16 October 2021

पुदिना चटणी

 

पुदिना चटणी  



 

दोन वाट्या पुदिना घेतला तर एक वाटी कोथिंबीरीची पानं.. हिरव्या मिरच्या आणि मीठ चवीप्रमाणे.. अर्धा इंच आल्याचा तुकडा बारीक चिरून घेतला.. एक चमचा साखर आणि दोन चमचे लिंबाचा रस..  अर्रे ... कैरी असेल तर अहाहा.. कैरीचा कीस घ्या दोन चमचे (किंवा चवीप्रमाणे करा ऍडजस्ट)  .. एक छोटा/ मध्यम कांदा चिरून घ्या जीरं वगैरे हवं असेल तर घ्या पण मी नाही घेतलं..  खिक्क

हे सगळं मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि ही हिरवीगार चटणी, वडे, इडल्या, डोसे, अडे किंवा आणखी कशाहीबरोबर खा!! खूप रिफ्रेशिंग आहे...

Wednesday 13 October 2021

काकडीचं पिठलं

 

काकडीचं पिठलं

 


काकडीचं पिठलं :  एक खिरा  काकडी साल काढून किसून घ्या. आता एका बाऊलमध्ये पाव वाटी बेसन पाण्यात कालवून ठेवा. आता गॅसवे एका कढईत फोडणीसाठी तेल गरम करत ठेवा .तेल चांगले तापले की त्यात  मोहरी घाला, मोहरी छान तडतडली की त्यात हिंग घाला. एका हिरव्या  मिरचीचे  तुकडे करून घाला . त्यावर हळद घालून परतून घेतल्यावर काकडीचा कीस घाला . तो कीस चांगला वाफवा . त्यात चवीनुसार तिखट आणि मीठ घालून छान मिसळून घेघ्या. आता त्यावर बाऊलमध्ये पाण्यात कालवउण ठेव लेलं बेसन घाला. जितकं पातळ हवं असेल तितकं पाणी घालून  मस्त वाफ येऊ द्या .

आता गॅसवर एका छोट्या कढल्यात फोडणी करा. त्यात भरपूर तिखट आणि थोडं मीठ घाला.

गरम पिठल्यावर ही फोडणी घालून सर्व्ह करा. खूपच  छान लागते हे पिठले.

 

Thursday 7 October 2021

मुगडाळ-शेवयांची खिचडी

 

मुगडाळ-शेवयांची खिचडी

 


 

या खिचडीत मुगाची डाळ भरपूर प्रमाणात घालतात. त्यामुळे पौष्टिकतेच्या दृष्टीनेही नाष्टा म्हणून किंवा रात्रीच्या वेळी पचायला हलकी असल्याने जेवणांत  ही खिचडी करावी.

साहित्य  : एक वाटी गणेश शेवया (इतर कुठल्याही शेवया वापरल्या तरी चालतील) , एक वाटी मूगाची डाळ ,एक बारीक चिरलेला कांदा,दोन टेबलस्पून साजूक तूप,चवीनुसार मीठ व २-३ हिरव्या मिरच्या,एक चमचा गोडा काळा  मसाला, फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा जिरे,एक छोटा चमचा हळद,चिमूटभर हिंग, सजावटीसाठी मूठभर बारीक  चिरलेली कोथिंबीर व पाव वाटी खवलेला ओल्या नारळाचा चव,चार वाट्या गरम पाणी

कृती : खिचडीला सुरवात करण्यापूर्वी अर्धा तास आगोदर मूगाची डाळ स्वच्छ धुवून घ्या आणि पाण्यात भिजत घालून ठेवा.

आता गॅसवर एका  कढईत साजूक तूप गरम करून त्यात शेवया घाला व  मध्यम आचेवर सोनेरी रंगावर खमंग भाजून एका परातीत काढून ठेवा.

नंतर त्याच कढईत फोडणीसाठी तेल गरम करुन घ्या. तेल चांगले तापल्यावर त्यात मोहरी आणि जिरं घालून दोन्ही चांगले  तडतडल्यावर  हिंग व हळद क्रमाने टाकून एखादे मिनिट परतून घ्यावे व मग  हिरव्या मिरचांचे तुकडे टाकावे.

मिरची खमंग तळली गेल्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून  किंचित रंग बदलून पारदर्शक होई पर्यंत परतून घ्यावा. लक्षांत ठेवा परतून कांदा जास्त ब्राऊन  होऊ देऊ नका.

आता त्यात मगाशी भाजून ठेवलेल्या शेवया टाकाव्या व भिजत घातलेली  मुगाची डाळ घाला. चवीप्रमाणे मीठ घाला,काळा गोडा मसाला घाला व झार्‍याने चांगले हलवून घ्या.

दरम्यान दुसरीकडे गॅसवर एका उभ्या गंजात पाणी ऊकळायला ठेवावे.

आता हे ऊकळते पाणी फोडणीला टाकून परतलेल्या  मूग डाळ+शेवयांमध्ये टाकावे.साधारणपणे सर्व शेवया बुडून दोन बोटं पाणी वर शिल्लक राहील एवढे पाणी टाकावे.

आता गॅस बारीक करून दोन मिनीटे खिचडीचे हे मिश्रण शिजू द्यावे व शिजून थोडेसे आळल्यावर कडेने तूप सोडून झाकण ठेवावे आणि मंद आचेवर दणदणीत वाफ येऊ द्यावी. या वाफेवरच मुगाची डाळ पूर्ण शिजायला हवी.

ही मुगडाळ-शेवयाची गरमागरम खिचडी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि ओल्या नारळाचा चव यांनी सजावट करून लगेच सर्व्ह करावी.

या खिचडीला स्वतःचाच एव्हढा खमंगपणा असतो की त्यासोबत इतर कुठल्याच तोंडीलावण्याची गरज भासत नाही.

टीप : या खिचडीत आपण आपल्या आवडीप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या उदा. सिमला मिरची, श्रावण घेवडा (फरसबी), तोंडली,वांगी,मश्रूम्स्, स्वीट कॉर्न , मटार,बटाटा,फ्लॉवर इ. घालू शकता.

Tuesday 5 October 2021

हिरव्या मिरच्यांची सुक्की चटणी

 हिरव्या मिरच्यांची सुक्की चटणी



साहित्य : ८-१० हिरव्या मिरच्या,अर्धी वाटी भट्टीवर भाजलेले शेंगदाणे, अर्धी वाटी सुक्या गोटा खोबर्याचा कीस,एक चमचा जिरे,चवीनुसार मीठ,आंबटपणासाठी २-३ आमसुले
कृती : हिरव्या मिरच्यांची देठे काढून मीठ जिऱ्याबरोबर मिक्सरमधून जाडसर वाटून घ्या.
गॅसवर मंद आंचेवर सुक्या गोटा खोबऱ्याचा कीस भाजून घ्या. हा भाजका कीस अर्धी वाटी आणि भट्टीवरून भाजून आणलेले शेंगदाणे अर्धीवाटी घेऊन मिक्सरमध्ये मिरचीबरोबर वाटून घ्या.
आंबटपणासाठी आमसुले सर्वात उत्तम. मिक्सरमध्ये थोडी आमसुले घालून फिरवा.
टीप : आमसुलाऐवजी चिंच किंवा लिंबूरस वापरता येईल. ही चटणी आठवडाभर छान टिकते. आणि हो,जर ही चटणी मिक्सर ऐवजी खलबत्त्यात कुठली तर चटणीला अजूनच चांगली चव येते बरं का.

Monday 4 October 2021

निलंगा राईस

 

निलंगा राईस


 

दीड वाट्या  इंद्रायणी किंवा दिल्ली अथवा बासमती   तांदूळ आणि अर्धी वाटी मसूरडाळ धुवून चाळणीत पाणी निथळत ठेवा.

गॅसवर एका पॅन मध्ये तूप तापवून त्यात जिरे,तमालपत्र, मिरे,लवंग,दालचिनी  घालुन चांगले परतून घ्या. आता त्यात उभा चिरलेला कांदा,बटाटा,टोमॅटो घातला.ह्या भाज्या परतवून घेतल्यावर त्यात हिरवी मिरची,मेथी घालून आणखी थोडे परता. मग त्यात चवीनुसार मीठ आणि थोडे दही घाला .काळा मसाला आणि लाल तिखट घालून तेल सुटल्यावर धुवून निथळत ठेवलेले डाळ आणि तांदूळ घाला.

सगळ्यात शेवटी आधणाचे उकळते पाणी घालून शिजवा. पापड आणि लोणच्या सोबत गरमागरम निलंगा राईस वर साजूक तूप घालून सर्व्ह करा.

Friday 1 October 2021

मनगणं

आज केलेली ही एक खूप जुनी कर्नाटक व गोव्यातील पारंपारिक रेसिपी ' मनगणं '

मनगणं



वाटीभर हरभरा डाळ मऊ शिजवून घेऊन, हलकेच घोटून त्यात चार चमचे भिजवलेला साबुदाणा व वाटीभर गूळ घालून शिजवून घ्यायचे व मग त्यात तुपावर सोनेरी रंगावर परतलेले काजू, ओल्या नारळाचे काप घालून गॅस बंद करून ४-५ वाट्या नारळाचे दूध घालायचे आणि वेलदोडे- जायफळ पूड घातली की हे मनगणं तयार होतं..!