Friday 17 October 2014

अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म

अन्न हे पूर्ण ब्रह्म उदर भरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म

प्रतिज्ञा :
१ . अन्न तयार करतेवेळी ,इतरांना अन्न वाढतेवेळी तसेच स्वत: अन्न ग्रहण करतेवेळी (खातेवेळी) मी अतिशय काटेकोरपणे स्वच्छतेचे पालन करेन.
२ . मी अतिशय मन:पूर्वक व श्रद्धापूर्वक अन्न तयार कारेन.
३ . इतरांना अन्न वाढल्यानंतरच मी अन्न ग्रहण करेन.  (खाईन)
४ . जेवतांना मी कोणत्याही आवडी-निवडी ठेवणार नाही.
५ . जेवतांना मी पानात काहीही टाकणार नाही व अन्नाची नासाडी होऊ देणार नाही,अन्न वाया जाऊ देणार नाही.
६ . जेवतांना मी अन्नाबद्दल कोणतीही तक्रार करणार नाही.
७ . जेवतांना मी श्रद्धेने,आनंदाने व समाधानाने जेवणाचा आस्वाद घेईन व जेवण झाल्यावर तृप्तीचा ढेकर देईन.
८ . जेवतांना मी बडबड करणार नाही व निमूटपणे माझे लक्ष फक्त जेवणावरच केंद्रीत करेन.