Saturday 31 March 2018

कढी पकोडा

कढी पकोडा


साहित्य  : पकोड्यांसाठी : दोन वाट्या बेसन पीठ,चवीनुसार ४-५ बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या,एक लहान चमचा लाल तिखट, चवीनुसार मीठ ,मोहन म्हणून दोन टेबलस्पून तेल,पकोडे तळण्यासाठी गरजेनुसार वेगळं तेल.
कढीसाठी साहित्य  : ५-६ कप आंबट दही,५-६ त्बलस्पून बेसन पीठ,फोडणीसाठी एक चमचा तेल,एक छोटा चमचा मोहरी,अर्धा छोटा चमचा हळदपूड,एक छोटा चमचा जिरे,एक चमचा आले-हिरवी मिरची यांची पेस्ट,चिमूटभर हिंग,चवीनुसार साखर व मीठ.
कढीला वरून द्यायच्या फोडणीसाठी : एक चमचा चमचा तेल,दोन अख्ख्या सुक्या लाल मिरच्या.
कृती : कढी बनवण्यासाठी दह्यामध्ये बेसन व पाणी घालून हॅण्ड मिक्सरने (ब्लेंडरने) एकजीव करुन घ्या.
आता गॅसवर एका मोठ्या पातेल्यात तेल गरम करून त्यामध्ये जिरे,मोहरी, हिंगाची फोडणी घाला. मग त्यामध्ये आलं-हिरव्या मिरच्याची पेस्ट आणि हळद घाला.
मग दही-बेसनाचं मिश्रण आणि मीठ घाला. मोठ्या आचेवर मिश्रण उकळा. मग आच कमी करा. जवळपास १५ मिनिटं मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत शिजवा.
दुसरीकदे पकोड्यांसाठी बेसनमध्ये पाणी घालून घट्ट भजीसारखं पीठ तयार करा आणि ते व्यवस्थित फेटा.
नंतर त्यामध्ये हिरव्या मिरच्याचा ठेचा, लाल तिखट, मीठ आणि गरम तेल घाला. पुन्हा एकवार फेटा. मग गरम तेलात याचे पकोडे तळून ठेवा.
शिजलेल्या कढीमध्ये हे पकोडे टाका आणि ५ मिनिटं आणखी मंद आचेवर शिजू द्या. यानंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये कढी ओता.
आता गॅसवर एका कढल्यामध्ये कढीला वरून द्यायच्या फोडणीसाठी एक चमचा तेल गरम करून त्यामध्ये दोन लाल सुक्या मिरच्या घालून एक मिनिट परता आणि ही फोडणी कढीवर ओता. वरून फोडणी घातल्यानंतर या पदार्थाला एक वेगळंच रूप मिळतं व अङ्कोखा आस्वादही येतो.


ओली शेव

ओली शेव


साहित्य : दोन वाट्या बेसनाचे (चणा डाळीचे) पीठ,अर्धा चमचा हळद,चवीनुसार मीठ,एक चमचा प्रत्येकी धने-जिरे पावडर,एक टेबलस्पून मोहन साठी तेल ,दोन टेबलस्पून दही,एक टेबलस्पून साखर,एक वाटी पाणी,मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर,अर्धी मूठ ओल्या नारळाचा खोवलेला चव,३-४ हिरव्या मिरच्या,५-६ बारीक चिरलेल्या लसणाच्या पाकळ्या,अर्धा चमचा मोहरी,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा हळद,एक छोटा चमचा हिंग,एक टेबलस्पून तेल.
कृती : एका बाउलमध्ये बेसन (चणा डाळ) पीठ घेऊन त्यात धने-जिरे पावडर,हळद,चवीनुसार मीठ व साखर आणि दही घालून हाताने कालवून छान मिक्स करा. जरूरी असेल त्याप्रमाणे पाणी घालून भिजवलेल्या पिठाची स्मूथ पेस्ट बनवा.
 गॅसवर एका पॅनमध्ये थोडेसे तेल  घालून गरम करून घेऊन त्यात ही भिजवलेल्या बेसन पिठाची पेस्ट घालून त्याच शिजवून घेऊन उकड काढून घ्या.
एकीकडे उकड काढलेल्या बेसन पिठाचा एक मोठा गोळा हातात घ्या आणि चकली-शेवेच्या साच्याला (लाकडी/स्टील/पितळी  कोणताही चालेल) आंतून तेलाचा हात लावून घ्या व त्या सोर्‍यात उकडीचा गोळा हाताने दाबून भरा आणि सोर्‍यावर दाब देऊन गोलकार फिरवत लांब शेवयाचे गोल एका मोठ्या प्लॅस्टिक पेपरवर किंवा मोठ्या स्टीलच्या ताटात घाला.
आता दुसरीकडे कढईत फोडणी साठी तेल गरम करायला ठेवा. तेल चांगले तापले की त्यात मोहरी घाला. मोहरी चांगली तडतडली की त्यात हिंग घाला व एक मिनिट परतून घ्या.नंतर त्यात बारीक चिरलेला लसूण घालून २-३ मिनिटे आणखीन परता. मग त्यात हळद,बारीक चिरलेली हिरवी मिरची व जिरे घालून आणखी दोन मिनिटे परता. शेवटी त्या फोडणीत बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करून चमच्याने फोडणी खाली-वर हलवून घ्या आणि मग ती फोडणी प्लास्टीक पेपरवर/स्टीलच्या मोठ्या ताटात काढलेल्या ओल्या शेवेवर पासून ओता. सर्व्ह  करतेवेळी वर आणखीन बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून सर्व्ह करा.


Friday 30 March 2018

आंब्याची डाळ

आंब्याची डाळ

(चैत्र गौरीच्या हळदी-कुंकवासाठी घरोघरी केला जाणारा पदार्थ)



साहित्य : दोन वाट्या हरभरा (चणा) डाळ(भिजवलेली) , अर्धी वाटी कच्या कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी-जास्त करावे) , चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा ,चवीनुसार मीठ व साखर,ओल्या नारळाचा खोवलेला चव,चिरलेली कोथिंबीर,फोडणीचे साहित्य – तेल,मोहरी,जिरे,हळद व हिंग
कृती : किमान ४ ते ५ तास आधी हरभर्‍याची डाळ भिजत घालून ठेवावी. नंतर ती रोळीत उपसून घेऊन डाळीतील पाणी पूर्ण निथळू द्यावे.नंतर डाळ मिक्सरमधून थोडीशी जाडसर- भरडच वाटावी, डाळ वाटताना त्यात चवीनुसार हिरव्या मिरच्यांचा ठेचाही घालावा. 
ही वाटलेली डाळ+हिरव्या मिरच्यांचा ठेचा , कैरीचा कीस हे सगळे एकत्र करून त्यात ओल्या खोबर्‍याचा चव ,चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालावी.तेलाची खमंग फोडणी करावी व ही फोडणी त्या मिश्रणावर ओतावी व चांगले एकजीव होईल असे कालवावे.
सर्व्ह करताना खोबर्‍याचा चव व बारीक चिरलेली कोथिंबीर वरुन घालून सजवावी.


टीप : कैर्‍यांचा सीझन नसतांना म्हणजे गणपतीचे विसर्जनाचे वेळी नैवेद्य म्हणून ही डाळ करतांना कैरी ऐवजी लिंबू  वापरतात. त्याला लिंबाची डाळ असे म्हणतात.दोन्हीचे स्वाद वेगवेगळे लागतात.  



कच्च्या कैरीचे पन्हे


(चैत्र गौरीच्या हळदी-कुंकवासाठी केले जाणारे पेय)

कैरीचे पदार्थ : थंडगार पन्ह ,कैरीचं लोणचं ,कैरीची चटणी ,मेथांबा ,तक्कू ,कैरीची डाळ ,साखरआंबा किंवा गुळांबा, कढी. आज आपण पाहू या,कच्च्या कैरीचे पन्हे ची रेसिपी.
 साहित्य : एका कच्च्या कैरीचा कीस  (कैरीचे हिरवे साल  काढून टाकावे व फक्त पांढरा गर किसून घ्यावा),
किसाच्या दुप्पट प्रमाणात साखर किंवा गूळ , अर्धा छोटा चमचा केशर-वेलची अर्क व चिमुटभर मीठ

कृती : वर दिलेले केलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्यावे.
२ ते ३ मिनटे मिक्सरवर चांगल (कैरीचा कीस,साखर किंवा गूळ  एकजीव होईपर्यंत वाटावे.
आता ह्यात दोन भांडी थंड पाणी घालून पन्हे तयार करावे.
थंड असेपर्यंत लगेचच सर्व्ह करावे.
टीप : खास करून चैत्र गौरीच्या हळदी-कुंकू च्या प्रसंगी आंब्याची डाळ व हे कच्च्या कैरीचे पन्हे सवाष्णींना देण्याची रूढी-परंपरा आहे.



Thursday 29 March 2018

मसाला सुपारी

मसाला सुपारी


साहित्य : आदपाव (१२५ ग्राम) बर्डी (लाल) सुपारी,अर्धा किलो हिरवी बडीशेप,पाव किलोभाजलेली  धने डाळ ,७५ ग्राम ज्येष्ठमध पावडर,५० ग्राम हिरवी गुंज पत्ती,५ ग्राम प्रत्येकी लवंगा,दालचीनी व वेलदोडे यांच्या ग्राईंड केलेल्या  पावडरी ,पाऊण टेबलस्पून सैंधव मीठ, पाऊण टेबलस्पून काळे मीठ,१२५ ग्राम साजूक तूप,पाव छोटा डबा काश्मिरी सुगंधी पावडर.
कृती : बर्डी सुपारी बारीक कातरून ठेवा. गुंजपत्ती स्वच्छा करून घ्या. हिरवी बडिशोप मंद आंचेवर भाजून घ्या आणि सुपारीचे इतर मसाल्याचे घटक जिन्नस सुद्धा असेच मंद भाजून घ्या. थंड झाल्यावर बडीचेप मिक्सरवर रवाळ ग्राइंड करून घ्या.
आता गॅसवर एका मोठ्या पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात कातरून ठेवलेली सुपारी मंद आंचेवर ब्राऊन रंगावर व तळल्याचा मंद सुवास येईपर्यंत तळून काढा. थंड झाल्यावर या टाळून घेतलेल्या सुपारीत भाजून ग्राइंड लेलेली बडिशोप व इतर सर्व मसाल्याचे मंद आंचेवर भाऊ  घेतलेले घटक पदार्थ (पावडरी) मिक्स करून हाताने कालवून घ्या,किंवा चमच्याने खालीवर करत मिक्स करून घ्या. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
जेवणानंतर एक छोटा चमचा भर मसाला सुपारी मुख शुद्धी म्हणून खात जावी.यातील मसाल्यांमुळे  अन्न पचनास मदत होते व मुखाला दुर्गंधी येण्यापासून बचाव करते.


गावरान गवारीची भाजी

गावरान गवारीची भाजी


साहित्य : गावरान बुटकी गवार- पाव किलो,पाव वाटी लाल भोळ्याच्या फोडी,पाव चमचा ओवा,एक चमचा लाल तिखट ,अर्धी वाटी दूध , चवीनुसार मीठ आणि गूळ ,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद व एक छोटा चमचा मोहरी , मूठभर कोथिंबीर
कृती : गावराण बुटक्या गवारीचे देठ व शिरा काढून अख्खी गवार पाण्यात शिजवून घ्यावी.
गॅसवर एका पॅनमध्ये तेलाची फोडणी करून त्यात हिंग , मोहरी, हळद व ओवा घालून शिजलेली गवार 
लाल भोळ्याच्या फोडी फोडणीत घालाव्या.
भाजी शिजत असतांनाच गवारीवर अर्धा वाटी दूध व लाल तिखट घालावे. भाजी शिजत आली की चवीनुसार मीठ, गूळ घालावा. गूळ विरघळून भाजी शिजली की चिरलेली कोथिंबीर घालावी.

कांद्याची पीठ पेरून भाजी

कांद्याची पीठ पेरून भाजी


ही अतिशय कमी वेळांत झटपट होणारी सुकी भाजी आहे.
साहित्य : चार माध्यम आकाराचे कांदे,चार टेबलस्पून चणा डाळीचे (बेसन) पीठ, चवीनुसार लाल तिखट,मीठ व साखर,फोडणीसाठी तेल,मोहरी,जिरे,हळद व हिंग,बारीक चिरलेली कोथिंबीर  
कृती : कांड्यांची साले काढून चिरून घ्या. गॅसवर एका कढईत फोडणीसाठी तेल तापवून घेऊन त्यात मोहरीव जिरे टाका. ते चांगले तडतडल्यावर त्यात हळद व हिंग घालून एक मिनिट परतून घ्या व मगत्यात चवीनुसार तिखट,मीठ व साखर घालून पुन्हा एक मिनिट परता. आता चिरलेला कांदा घालून परतून घ्या व झाकण ठेवून दोन-तीन मिनिटे कांदा शिजवून घ्या. झाकण काढून शिजलेल्या कांद्यावर हाताने पीठ भुरभुरत रहा. भाजीला पीठ लावताना एकीकडे उलथण्याने भाजी हलवत रहा. पीठ लावून झाले की एक वाफ काढून घेऊन वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून भाजीवर झाकण ठेऊन गॅस बंद करा.  
पोळी बरोबर ही भाजी सर्व्ह करा.

Friday 23 March 2018

गावरान गवारीची भाजी

गावरान गवारीची भाजी


साहित्य :  गावरान बुटकी गवार- पाव किलो,पाव चमचा ओवा,एक चमचा लाल तिखट ,अर्धी वाटी  दूध , चवीनुसार मीठ आणि गूळ ,तडका फोडणीसाठी एक टेबलस्पून तेल, चिमूटभर हिंग, पाव चमचा  हळद व एक छोटा चमचा मोहरी , मूठभर कोथिंबीर  
कृती : गावराण बुटक्या गवारीचे देठ व शिरा काढून अख्खी गवार पाण्यात शिजवून घ्यावी.
गॅसवर एका पॅनमध्ये तेलाची फोडणी करून त्यात हिंग , मोहरी, हळद व ओवा घालून शिजलेली गवार फोडणीत घालावी.
शिजत असतांनाच गवारीवर अर्धा वाटी दूध व लाल तिखट घालावे. भाजी शिजत आली की चवीनुसार मीठ, गूळ घालावा. गूळ विरघळून भाजी शिजली की चिरलेली कोथिंबीर घालावी.


कणकेच्या खुसखुशीत वड्या




साहित्य :  चार वाट्या कणीक (गव्हाचे पीठ) ,दीड  ते दोन वाट्या (आवडीनुसार कमी-जास्त) किसलेला पिवळा जर्द कोल्हापुरी गूळ, दोन वाट्या साजूक तूप,दोन टेबलस्पून तीळ,काजू, अर्धी बदाम,पिस्ते इ. ड्राय फ्रूट्सचे काप,अर्धी मूठ बेदाणे ,एक छोटा चमचा वेलदोडयाची अथवा जायफळाची पूड,पाव कप दूध, ३-४ केशराच्या काड्या (कोमट दुधात खलून घ्याव्यात)
कृती:  सुरवातीला साजूक तुपावर कणीक खंमग घ्यावी, कणीक भाजून होत आल्यावर त्यातच तीळ घालून थोडे भाजून घ्यावे.कणीक खरपूस भाजून जराशी लालसर झाली की त्यावर दूधाचा हबका मारावा आणि लगेच त्या  किसलेला गूळ टाकुन दोन मिनिटे परतून घेतल्यावर त्यात काजु, पिस्ते , बदाम इ. ड्राय फ्रूट्सचे काप,बेदाणे , वेलदोडयाची अथवा जायफळाची पूड, दुधात खललेल्या केशराच्या काड्या  घालुन एका तूपाचा हात लावलेल्या थाळित थापाव्या आणि साधारण गार झाल्यावर वड्या कापाव्या
टीप : खरपुस भाजलेल्या कणकीवर दुधाचा हबका मारल्याने कणकेला छान जाळी पडते आणि वडी खाताना कणीक चिकट लागत नाही.


Wednesday 21 March 2018

मसाला सुपारी

मसाला सुपारी



साहित्य : आदपाव (१२५ ग्राम) बर्डी (लाल) सुपारी,अर्धा किलो हिरवी बडीशेप,पाव किलोभाजलेली  धने डाळ ,७५ ग्राम ज्येष्ठमध पावडर,५० ग्राम हिरवी गुंज पत्ती,५ ग्राम प्रत्येकी लवंगा,दालचीनी व वेलदोडे यांच्या ग्राईंड केलेल्या  पावडरी ,पाऊण टेबलस्पून सैंधव मीठ, पाऊण टेबलस्पून काळे मीठ,१२५ ग्राम साजूक तूप,पाव छोटा डबा काश्मिरी सुगंधी पावडर.
कृती : बर्डी सुपारी बारीक कातरून ठेवा. गुंजपत्ती स्वच्छा करून घ्या. हिरवी बडिशोप मंद आंचेवर भाजून घ्या आणि सुपारीचे इतर मसाल्याचे घटक जिन्नस सुद्धा असेच मंद भाजून घ्या. थंड झाल्यावर बडीचेप मिक्सरवर रवाळ ग्राइंड करून घ्या.
आता गॅसवर एका मोठ्या पॅनमध्ये तूप गरम करा आणि त्यात कातरून ठेवलेली सुपारी मंद आंचेवर ब्राऊन रंगावर व तळल्याचा मंद सुवास येईपर्यंत तळून काढा. थंड झाल्यावर या टाळून घेतलेल्या सुपारीत भाजून ग्राइंड लेलेली बडिशोप व इतर सर्व मसाल्याचे मंद आंचेवर भाऊ  घेतलेले घटक पदार्थ (पावडरी) मिक्स करून हाताने कालवून घ्या,किंवा चमच्याने खालीवर करत मिक्स करून घ्या. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवा.
जेवणानंतर एक छोटा चमचा भर मसाला सुपारी मुख शुद्धी म्हणून खात जावी.यातील मसाल्यांमुळे  अन्न पचनास मदत होते व मुखाला दुर्गंधी येण्यापासून बचाव करते.


भरली भेंडी

भरली भेंडी 





मधुमेहिंसाठी अतिशय उपयुक्त औषधी असलेली भाजी
साहित्य  :  २५० ग्रॅम भेंडी,एक टेबलस्पून खोवलेले  ओल खोबरं,दोन टेबलस्पून लाल भोपल्याचा कीस,एक टेबलस्पून ताजी चिरलेली कोथिंबीर,अर्धा चमचा धने पूड,अर्धा चमचा हळद,अर्धा चमचा डाळींबाचे दाणे,एक छोटा चमचा गरम मसाला,चवीनुसार सैंधव मीठ.
कृती  :  भरली भेंडी बनवण्यासाठी ती स्वच्छ धुवून दोन्ही बाजूचा शेवटचा भाग कापा.भेंडी उभी चिरा मात्र दोन तुकडे होणार नाही याची काळजी करा
एका बाउलमध्ये भोपळ्याचा कीस, डाळीब्याचे दाणे, खोबरं, यामध्ये सारे मसाले आणि मीठ मिसळून एकत्र मिश्रण बनवा.
उभ्या चिरलेल्या भेंडीमध्ये हे तयार मिश्रण हाताने नीट दाबून भरा.
गॅसवर एका  तव्यावर चमच्याभर तेलामध्ये या मसाला भरलेल्या भेंड्या ठेवा.
७-८ मिनिटे या भेंड्या चांगल्या खरपूस परता.
भेंडी खुरपूस परतल्यानंतर बाहेर काढा.
गरम भरली भेंडी चपातीसोबत किंवा फुलक्यासोबत अधिक चविष्ट लागतात

आलू-पालक स्टफ्ड पराठे

आलू-पालक स्टफ्ड पराठे


साहित्य : पराठ्याच्या आंतील सारणासाठी : दोन मोठे उकडलेले बटाटे,एक जुड्डी पालकची कोवळी पाने, एक मध्यम कांदा-बारीक चिरून,एक चमचा आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट,चवीनुसार मीठ,अर्धी वाटी तेल.
आवरणासाठी : दोन वाट्या कणीक,तेल , मीठ व गरजेनुसार पाणी.
कृती : उकडलेले बटाटे किसून ठेवा, कांदा अतिशय बारीक चिरून ठेवा. 
एका परातीत पारीसाठी (आवरणासाठी) कणीक घ्या,त्यात मीठ , तेल व जरूर तेव्हढेच पाणी घालून नेहमी पराठ्यासाठी भिजवतो त्याप्रमाणे आरवरणाचे पीठ भिजवून ठेवा.
आता गॅसवर एका पॅनमध्ये तेल गरम करून घ्या. मग त्या गरम तेलात बारीक चिरलेला कांदा घालून सोनेरी ब्राऊन रंगावर परता. नंतर त्यात आले-लसूण-हिरवी मिरचीची पेस्ट घालून पुन्हा दोन मिनिटे परतून घेऊन मग त्यात कोवळी पालकची पाने घालून पुन्हा २-३ मिनिटे परता.आता उकडलेल्या बटाट्याचा कीस व चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्या व ३-४ मिनिटे परतून घेऊन गॅस बंद करा. थंड झाल्यावर पुन्हा एकदा चांगले मिक्स करून घ्या. स्टफिंग म्हणून पराठ्याचे आंत भरावचे सारण तयार आहे.
भिजवून तयार ठेवलेल्या पिठाचा एक लाडवा एव्हढा गोळा पोळपाटावर लाटून त्यात तयार करून ठेवलेले सारण भरा व पराठा लाटून घेऊन तापलेल्या तव्यावर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून काढा. पराठा भाजातांना बाजूंनी थोडे तेल सोडा.
गरम पराठे दही व हिरव्या कोथिंबीरीच्या चटणीसोबत सर्व्ह करा.
हे आलू-पालक पराठे खूपच स्वादिष्ट लागतात.व भरगच्च नाश्ता म्हणून कामी येतात.

Thursday 15 March 2018

कढीपत्त्याची ओली चटणी

कढीपत्त्याची ओली चटणी



साहित्य : दोन वाट्याभरुन  कढीपत्त्याची पाने,अर्धी वाटी ओल्या नारळाचा चव,एक टेबलस्पून तेल,चवीनुसार ३-४ हिरव्या मिरच्या,१-२ लाल सुक्या मिरच्या,दोन टेबलस्पून घट्ट चिंचेचा कोळ,एक टेबलस्पून किसलेला गूळ,एक चमचा चण्याची (हरभरा) डाळ, एक चमचा उडदाची डाळ,एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा जिरे,अर्धा छोटा चमचा हिंग व चवीनुसार मीठ.
कृती : कढी पत्त्याची पाने दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घ्या व चाळणीत घालून पाणी निथळून  कोरडी करून घ्या. 
गॅसवर एक फ्राय पॅन मध्ये एक छोटा चमचा तेल गरम करून तेल चांगले गरम झाल्यावर त्यात मोहरी व जिरे घाला व दोन्ही चांगले तडतडल्यावर चणा व उडदाची डाळ घालून परता व दोन्ही डाळी वाफेवर शिजू द्या. परतून दोन्ही डाळी ब्राऊन रंगाच्या झाल्या की त्यात लाल मिरचीचे तिखट व हिंग घालून दोन मिनिटे पुन्हा परतून घ्या. मग हे परतलेले मसाले एका बाऊलमध्ये काढून ठेवा.
आता पॅनमध्ये उरलेले तेल घाला व तेल गरम झाल्यावर त्यात कढीपत्त्याची पाने घाला व दोन मिनिटे सारखे झार्‍याने हलवत राहून परतत रहा. परतत असतांनाच त्यात ओल्या नारळाचा चव व हिरव्या मिरच्याचे तुकडे घाला व एक मिनिट परतून घ्या.
परतून घेतलेली कढीपत्त्याची पाने,डाळी व मसाले हे सगळे साहित्य व त्या सोबत चेचा कोळ,गूळ , मीठ व पाव वाटी पाणी मिक्सरच्या ग्राइंडरच्या भांड्यात  घालून मिक्सरमधून बारीक चटणी वाटून घ्या.
खूप स्वादिष्ट अशी कढीपत्त्याची हिरवी चटणी तयार झाली आहे.
ही चटणी इडली,डोसा किंवा भजी यांच्या सोबत सर्व्ह करा.
.