साहित्य : दोन वाट्या तुरीच्या डाळीचे वरण (शिजवलेले) , एक कांदा उभा चिरून , ८-९ लसूण पाकळ्या ठेचून ,
आल पाव इंच आले किसून , एक चमचा प्रत्येकी जीरे , मोहरी व हळद पावडर , चवीनुसार लाल
मिरची पावडर , अर्धा चमचा गरम मसाला पावडर,चार अक्खी मिरी , हिंग एक चमचा , लाल मिरची ओलि चिरून , अर्धी
वाटी
कोथिंबीर , एक
मोठा टोमाटो उभा चिरून , ७-८ कढी पत्ता पाने
, दोन चमचे तेल , एक ते दोन चमचे बटर
चवीनुसार मीठ (एक ते दीड चमचा)
कृती : गॅसवर एका कढईत तेल तापत टाकून
जिरे ,मोहरी, मिरी ,आल ,लसूण ,कढीपत्ता , चिरलेली लाल मिरची
व कांदा घालून परतून घ्या ,त्यात टोमॅटो घालून परता , त्यात हिंग ,हळद पावडर, गरम मसाला , लाल
मिरची पावडर व मीठ घालून परता , त्यात शिजलेली तूर डाल घालून
व थोडस पाणी घालून उकळी येवू द्या.
त्यात एक ते दोन चमचे अमूल बटर घाला व
बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सजवा !!
मस्त झणझणीत परफेक्ट डाळं तडका तय्यार
!!!
No comments:
Post a Comment