(चैत्र गौरीच्या हळदी-कुंकवासाठी केले जाणारे पेय)
कैरीचे पदार्थ : थंडगार पन्ह ,कैरीचं लोणचं ,कैरीची चटणी ,मेथांबा ,तक्कू ,कैरीची डाळ ,साखरआंबा किंवा गुळांबा, कढी. आज
आपण पाहू या,कच्च्या कैरीचे पन्हे ची रेसिपी.
साहित्य : एका कच्च्या कैरीचा कीस (कैरीचे हिरवे साल काढून टाकावे व फक्त पांढरा गर किसून घ्यावा),
किसाच्या
दुप्पट प्रमाणात साखर किंवा गूळ , अर्धा छोटा चमचा केशर-वेलची अर्क व चिमुटभर मीठ
कृती
: वर
दिलेले केलेले सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात घ्यावे.
२
ते ३ मिनटे मिक्सरवर चांगल (कैरीचा कीस,साखर किंवा गूळ एकजीव होईपर्यंत वाटावे.
आता
ह्यात दोन भांडी थंड पाणी घालून पन्हे तयार करावे.
थंड
असेपर्यंत लगेचच सर्व्ह करावे.
टीप
: खास करून चैत्र गौरीच्या हळदी-कुंकू च्या प्रसंगी आंब्याची डाळ व हे कच्च्या कैरीचे
पन्हे सवाष्णींना देण्याची रूढी-परंपरा आहे.
No comments:
Post a Comment