Search This Blog

Friday, 30 March 2018

आंब्याची डाळ

आंब्याची डाळ

(चैत्र गौरीच्या हळदी-कुंकवासाठी घरोघरी केला जाणारा पदार्थ)



साहित्य : दोन वाट्या हरभरा (चणा) डाळ(भिजवलेली) , अर्धी वाटी कच्या कैरीचा कीस (कैरीच्या आंबटपणानुसार प्रमाण कमी-जास्त करावे) , चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा ,चवीनुसार मीठ व साखर,ओल्या नारळाचा खोवलेला चव,चिरलेली कोथिंबीर,फोडणीचे साहित्य – तेल,मोहरी,जिरे,हळद व हिंग
कृती : किमान ४ ते ५ तास आधी हरभर्‍याची डाळ भिजत घालून ठेवावी. नंतर ती रोळीत उपसून घेऊन डाळीतील पाणी पूर्ण निथळू द्यावे.नंतर डाळ मिक्सरमधून थोडीशी जाडसर- भरडच वाटावी, डाळ वाटताना त्यात चवीनुसार हिरव्या मिरच्यांचा ठेचाही घालावा. 
ही वाटलेली डाळ+हिरव्या मिरच्यांचा ठेचा , कैरीचा कीस हे सगळे एकत्र करून त्यात ओल्या खोबर्‍याचा चव ,चिरलेली कोथिंबीर,चवीनुसार मीठ आणि थोडी साखर घालावी.तेलाची खमंग फोडणी करावी व ही फोडणी त्या मिश्रणावर ओतावी व चांगले एकजीव होईल असे कालवावे.
सर्व्ह करताना खोबर्‍याचा चव व बारीक चिरलेली कोथिंबीर वरुन घालून सजवावी.


टीप : कैर्‍यांचा सीझन नसतांना म्हणजे गणपतीचे विसर्जनाचे वेळी नैवेद्य म्हणून ही डाळ करतांना कैरी ऐवजी लिंबू  वापरतात. त्याला लिंबाची डाळ असे म्हणतात.दोन्हीचे स्वाद वेगवेगळे लागतात.  



No comments:

Post a Comment