भोकराच्या
पानांची भाजी
साहित्य : भोकराची
कोवळी पाने, भिजवलेली मूगडाळ, हिरव्या
मिरच्या, कांदा, तेल, हळद, मीठ इत्यादी. कृती - भोकराची कोवळी पाने निवडून,
स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावीत. पानांचे देठ काढून टाकावेत व पाने
बारीक चिरून घ्यावीत. तेलात चिरलेला कांदा व मिरच्या परतून तांबूस होईपर्यंत
तळून-भाजून घ्यावे. नंतर चिरलेली भाजी व भिजवलेली मूगडाळ घालावी. नंतर हळद,
मीठ घालून सर्व भाजी चांगली परतून घेऊन अगदी थोडे पाणी घालून शिजवून
घ्यावी.
No comments:
Post a Comment