Sunday 24 January 2021

बीटच्या पुऱ्या

 

बीटच्या  पुऱ्या

 

साहित्य: दोन वाट्या कणिक, एक मध्यम आकाराचा बिटचा  कंद  उकडून व किसून ,मोहनसाठी  साजूक तूप, चवीनुसार मीठ व तिखट  

कृती : एका परातीत कणिक घेऊन त्यात उकडून किसलेला बीटाचा  कीस, साजूक तुपाचे मोहन ,मीठ व तिखट घालून पीठ घट्ट मळून घ्या. मळून घेतलेला पीठाचा गोळा  ओल्या सुती  कापडाने  झाकून मुरत ठेवा.

तासभराने  मुरलेली  कणिक  चांगली तिंबून घ्या.

उंडे (गोळे)  करून पुऱ्या लाटा.

गॅसवरती एका  कढईत तेल अगर वनस्पती तूप गरम करून पुऱ्या तळून काढा.

 

Saturday 2 January 2021

बाजरीचा पौष्टिक खिचडा (खास थंडीसाठी)

 

बाजरीचा पौष्टिक खिचडा (खास थंडीसाठी)



साहित्य : एक वाटी बाजरी,एक वाटी मुगाची डाळ,५-६ लसणाच्या पाकळ्या,चवीनुसार १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे,एक छोटा चमचा हळद,एक छोटा चमचा तिखट,चवीनुसार मीठ व बारीक चिरलेली कोथिंबीर व लसणाची फोडणी.

कृती : आगोदर बाजरी स्वच्छ धुवून घेऊन १५-२० मिनिटे भिजत ठेवा. नंतर ती मिक्सरवर ओबडधोबड वाटून घ्यावी. आता गॅसवर एका कढईत ८-१० वाट्या पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात हे बाजरीचे वाटण घालून ढवळत राहावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत. २-३ मिनिटे नीट उकळून घेतल्यावर त्यात मुगाची डाळ टाकावी. मिरची व लसणाचे वाटण घालावे. हळद,तिखट व चवीनुसार मीठ घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. मंद आंचेवर १५ मिनिटे शिजवून घ्या. डाळ नीट शिजली गेली की गॅस बंद करा.

जेवतांना हा बाजरीचा खिचडा पानांत वाढल्यावर त्यावर वरून लसणाची फोडणी घालून सोबत कांदा द्यावा.