बाजरीचा पौष्टिक खिचडा (खास थंडीसाठी)
साहित्य : एक वाटी
बाजरी,एक वाटी मुगाची डाळ,५-६ लसणाच्या पाकळ्या,चवीनुसार १-२ हिरव्या मिरच्यांचे तुकडे,एक छोटा चमचा हळद,एक छोटा चमचा तिखट,चवीनुसार मीठ व बारीक
चिरलेली कोथिंबीर व लसणाची फोडणी.
कृती : आगोदर बाजरी
स्वच्छ धुवून घेऊन १५-२० मिनिटे भिजत ठेवा. नंतर ती मिक्सरवर ओबडधोबड वाटून घ्यावी.
आता गॅसवर एका कढईत ८-१० वाट्या पाणी उकळायला ठेवा. पाण्याला उकळी आली की त्यात हे
बाजरीचे वाटण घालून ढवळत राहावे. गुठळ्या होऊ देऊ नयेत. २-३ मिनिटे नीट उकळून
घेतल्यावर त्यात मुगाची डाळ टाकावी. मिरची व लसणाचे वाटण घालावे. हळद,तिखट व चवीनुसार मीठ
घालावे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून कढईवर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी.
मंद आंचेवर १५ मिनिटे शिजवून घ्या. डाळ नीट शिजली गेली की गॅस बंद करा.
जेवतांना हा बाजरीचा
खिचडा पानांत वाढल्यावर त्यावर वरून लसणाची फोडणी घालून सोबत कांदा द्यावा.
No comments:
Post a Comment