Monday 27 September 2021

दही खाकरा

 दही खाकरा

साहित्य : एक खाकरा,एक पापड,वाटीभर दही,चाट मसाला,चवीनुसार तिखट, सैंधवमीठ,साखर, भाजलेल्या जिर्याची पूड, बारीक चिरलेली कोथिंबीर,तेल
कृती : एका मोठ्या बाऊल मध्ये खाकऱ्याचा व पापडाचा चुरा करुन त्या चुऱ्यावर वर दही, सैंधव मीठ, भाजलेल्या जिर्याची पूड, लाल तिखाटाची पूड,तेल आणि थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर. असे कालवून एकदा खाऊन बघायच ! फार मस्त लागते. हलका, पोटभरीचा स्वादिष्ट नाश्ता.जरूर करुन बघा

Sunday 26 September 2021

तवस काकडीचे लोणचे

 तवस काकडीचे लोणचे

काही जण यालाच कायरस असेही म्हणतात. यात घातलेल्या फेटलेल्या मोहरीमुळे ,हे खातांना मस्तकात उग्र वास जाऊन जो ठसका लागतो व नाकातून पाणी येते त्यामुळे याला ‘नाकारडे’ पण म्हणतात
साहित्य : थोडी जून काकडी एक,मोहरी चार चमचे,मेथी अर्धा चमचा,मिरची एक,लिंबू एक मोठा,तेल,हिंग,हळद,मीठ,साखर आणि दोन चमचे कैरी लोणचे मसाला.
कृती :
प्रथम काकडीची सालं व बिया काढून तिचे बारीक तुकडे करुन घ्या.मोहरी ,मेथी , हिरवी मिरची,हिंग व थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये चांगले फेटून घ्या,आणि काकडीच्या तुकड्यामधे घालून मिक्स करा.नंतर दोन चमचे कैरी लोणचे मसाला आणि चवीनुसार मीठ साखर व लिंबाचा रस घाला.छोट्या कढल्यात तेल घेऊन त्यामधे मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व ती काकडीवर ओता.खमंग चटकदार असे काकडीचे लोणचे किंवा कायरस तयार !
तुम्ही याला काही ही नांव द्या पण ही डिश लागते फर्मास.
करून बघा आणि नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते...

Wednesday 22 September 2021

दही मिरच्या व भेंडी

दही मिरच्या व भेंडी

साहित्य : पोपटी रंगाच्या कमी तिखट ७-८ मिरच्या,५-६ भेंड्या ,वाटीभर दही, चवीनुसार मीठ,चविपुरती साखर,चार चमचे अर्धबोबडे खलबत्यात कुटलेले शेंगदाण्याचे कूट ,  फोडणीसाठी तेल, मोहरी,जिरे,हळद व हिंग

कृती : दहीमिरच्यांसाठी हिरव्यागार व पोपटी रंगाच्या मिरच्या घ्या. मिरच्या धुतल्यानंतर सुरीने त्यांना  चीरा पाडून घ्या.(सरळ दोन तुकडे केलेत तरी चालेल) मिरच्यांची  देठे ठेवलीत तरी चालेल. पहिल्यांदाच  बनवत असताल तर कमी तिखटच मिरच्या घ्या.

भेंड्या सुद्धा उभ्या चिरून ठेवा.

गॅसवर एका पॅन मध्ये हिंगाची फोडणी करा. हिंगाची फोडणी तडतडली की मिरच्या व भेंडी घाला व काही सेकंद परतून घेऊन पॅनवर झाकण ठेवा. गॅसची आंच मंदच  ठेवा. कितीही खटपट केली तरी मिरचीमुळे थोडा ठसका लागणारच. त्याला पर्याय नाही.

एक मिनिटाने झाकण काढा. कढई गॅसवरून उतरवा. त्यात तीनचार चमचे दही घाला. दही फारच घट्ट असेल तर थोडे पाणीही घाला. चमच्याने ढवळा व परत कढई गॅसवर ठेवा. दही फाटू नये म्हणून हे करायचे. मग यात चवीनुसार मीठ, हळद व अर्धबोबडे खलबत्यात कुटलेले शेंगदाण्याचे कूट घालून पॅनवर झाकण  ठेऊन  एक वाफ काढा. दाण्याच्या कुटामुळे मिश्रण एकदमच घट्ट झाले तर थोडे दही परत घाला. ढवळा व झाकण ठेवून अर्धा मिनिट ठेवा. मग गॅस बंद करा.

थोडावेळ तसेच ठेवा. नंतर एक नंबर दही मिरची भेंडी  पानात वाढा. घरात इतकी आवडेल की कदाचित परत करावी लागेल.

सवडीने एकदा नक्की बनवून बघा. 

Tuesday 21 September 2021

कोथिंबीरीचे डोसे

कोथिंबीरीचे डोसे

साहित्य : दोन वाट्या ज्वारीचे ताजे पीठ ,  पाव वाटी  बेसन पीठ , पाव  वाटी बारीक रवाअर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ,दोन टेबलस्पून दही , चवीपुरते मीठ , हिरवी मिरची , लसणाच्या पाकळ्या, जिरे,कढीपत्याची पाने,ओवा व जरुरीनुसार तेल

कृती : एका बाऊल मध्ये  दोन वाट्या ज्वारीचे ताजे पीठ ,  पाव वाटी  बेसन पीठ , पाव  वाटी बारीक रवा भिजत घालून ठेवा.

मिक्सरवर बारीक चिरलेली कोथिंबीर , दही , मीठ , हिरवी मिरची , लसणाच्या पाकळ्या, जिरे,कढीपत्याची पाने आणि ओवा हे एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घ्या.

बाऊलमध्ये भिजत घातलेले पीठ एका पातेल्यात काढून घेऊन त्यापिठात ही पेस्ट घालून मिक्स करा.

पिठात पाणी घालून डोशासाठी लागते तितपत पातळ पीठ झाले की उबदार जागी १५ मिनिटे झाकून ठेवा.

डोश्यांसाठी गॅसवर डोश्यांचा तवा तापत ठेवून त्यावर मिठाच्या पाण्याचा बोळा/ नारळाची शेंडी किंवा अर्धा कापलेला कांदा  फिरवून घ्या व मग तव्यावर चमचाभर तेल सोडून  मध्यभागी डावभर पीठ घालून डावाने सगळीकडे गोलाकार पसरून घ्या व दोन्ही बाजूंनी भाजून घेऊन डोसा तयार झाला की नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

महत्वाची सूचना -प्रत्येकवेळी पातेल्यातून डोश्यांचे पीठ काढताना आजूबाजूचे  पीठ ढवळले जाऊन आतील गॅस बाहेर निघून जाणार नाही याची काळजी घेऊन हलक्या हाताने पीठ घ्या , कारण गॅस / हवा बाहेर निघून गेल्यास डोसे जाळीदार व हलके होणार नाहीत)

Tuesday 14 September 2021

हळदी गाजराचे भरीत (रायता)

 हळदी गाजराचे भरीत (रायता)

साहित्य – तीन ते चार कोवळी हळदी गाजरे, तीन ते चार सांडगे मिरच्या, मध्यम आकाराचे एक वाटी थोडेसे आंबट दही, चवीनुसार मीठ,चविसाठी चिमुटभर साखर , दोन टेबल स्पून तेलाची फोडणी,एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा हळद,चिमूटभर हिंग.
कृती : आगोदर गाजरे स्वच्छ धुऊन,प्रेशरकुकरमधून चार शिट्ट्यांवर चांगली शिजवून घ्यावीत. थंड झाल्यावर, साले काढून अगदी बारीक चिरुन घ्यावीत . लाकडी मॅशरने चांगली ठेचावी,व घोटून घ्यावी. नंतर त्यात मीठ, दही आणि कुस्करलेल्या सांडग्यामिरच्या घालून गार फोडणी द्यावी.
रंगीत, सुंदर, चविष्ट रायता तोंडी लावणे तयार झाले. हे पोळी-भाकरी बरोबर, पराठ्याबरोबर फारच रुचकर लागते
टिप : गॅसवर एका काढल्यात फोडणी करताना प्रथम सांडगी मिरच्या तळून घेऊन मग त्यातच फोडणी करावी. वेगळे तेल घेऊ नये. मिरच्या ब्राऊन रंगावर तळाव्या. जर मिरच्या कुस्करल्या गेल्या नाहीत तर मिक्सरमध्ये अगदी थोडा वेळ घालून जाडसर काढाव्यात. विकतच्या सांडग्या, मिरच्या घेतल्या तर त्यात दही असते.मिरच्या कडक होतात. हाताने चुरल्या जात नाहीत.

Thursday 9 September 2021

सिमला ढोबळी (ढब्बू) मिरचीचे खाराचे लोणचे

 सिमला ढोबळी (ढब्बू) मिरचीचे खाराचे लोणचे

साहित्य : अर्धा किलो सिमला ढोबळी (ढब्बू) मिरच्या ,चवीनुसार २-३ हिरव्या मिरच्यांचे तुकडे, १००ग्राम मोहरीची डाळ, एक वाटी मीठ , केप्र किंवा प्रवीणचा खाराची मिरची मसाला एक पाकीट (१०० ग्राम) , अर्धा डझन लिंबे , ५० ग्राम आले , एक वाटी तेल आणि फोडणीसाठी मोहोरी, हळद,हिंग व मेथीची पूड

कृती : प्रथम सिमला ढोबळी ढब्बू) मिरच्या धुवून व स्वच्छ कापडाने पुसून कोरड्या करून घ्याव्यात व त्यांची देठे (देखे) खुडुन घ्यावीत,आतील बिया काढून टाकाव्यात. कात्रीने किंवा विळीवर चिरून त्यांचे बारीक तुकडे करून घ्या. चार लिंबांच्या फोडी करून घ्या.आल्याचे विळीवर किंवा सुरीने अतिशय बारीक तुकडे करून घ्या. मोहोरीची डाळ तेलात चांगली फेटून घ्या.
एका परातीत किंवा स्टीलच्या थाळ्यात सिमला मिरच्यांचे तुकडे,आल्याचे तुकडे,हिरव्या मिर्च्यांचे तुकडे,लिंबाच्या फोडी , फेटलेली मोहोरीची डाळ , मिरची मसाला व मीठ घालून ते मिश्रण मोठ्या चमच्याने हलवून चांगले एकजीव करून घ्या व एका स्वच्छा व कोरड्या काचेच्या किंवा चीनी मातीच्या घट्ट झाकणाच्या बरणीत भरा. गॅसवर कढईत वाटीभर तेल घेऊन चांगले कडकडीत तापल्यावर त्यात मोहोरी,हळद,हिंग व मेथीची पूड घालून फोडणी करून ती थंड झाल्यावर बरणीत भरलेल्या मिरच्यांवर ओता व चमच्याने हलवून वरती एक चमचा मिठ पसरा (थर द्या) आणि बरणी झाकण लावून त्यावर दादरा म्हणून एका स्वच्छ फडक्याने बांधून कपाटात अंधार्‍या जागी ठेवा.

दोन तीन दिवसांनंतर बरणी उघडून पुन्हा एकदा चमच्याने हलवून तोंडी लावणे म्हणून खायला द्या.