दही मिरच्या व भेंडी
साहित्य : पोपटी रंगाच्या कमी तिखट ७-८ मिरच्या,५-६ भेंड्या ,वाटीभर दही,
चवीनुसार मीठ,चविपुरती साखर,चार चमचे अर्धबोबडे खलबत्यात कुटलेले शेंगदाण्याचे कूट , फोडणीसाठी तेल, मोहरी,जिरे,हळद व हिंग
कृती : दहीमिरच्यांसाठी
हिरव्यागार व पोपटी रंगाच्या मिरच्या घ्या. मिरच्या धुतल्यानंतर सुरीने त्यांना चीरा पाडून घ्या.(सरळ दोन तुकडे केलेत तरी
चालेल) मिरच्यांची देठे ठेवलीत तरी चालेल.
पहिल्यांदाच बनवत असताल तर कमी तिखटच
मिरच्या घ्या.
भेंड्या सुद्धा उभ्या चिरून
ठेवा.
गॅसवर एका पॅन मध्ये हिंगाची फोडणी करा. हिंगाची फोडणी तडतडली की मिरच्या व भेंडी
घाला व काही सेकंद परतून घेऊन पॅनवर झाकण ठेवा. गॅसची आंच मंदच ठेवा. कितीही खटपट केली तरी मिरचीमुळे थोडा ठसका
लागणारच. त्याला पर्याय नाही.
एक मिनिटाने झाकण काढा.
कढई गॅसवरून उतरवा. त्यात तीनचार चमचे दही घाला. दही फारच घट्ट असेल तर थोडे पाणीही
घाला. चमच्याने ढवळा व परत कढई गॅसवर ठेवा. दही फाटू नये म्हणून हे करायचे. मग यात
चवीनुसार मीठ, हळद व अर्धबोबडे खलबत्यात कुटलेले शेंगदाण्याचे कूट घालून पॅनवर
झाकण ठेऊन एक वाफ काढा. दाण्याच्या कुटामुळे मिश्रण एकदमच
घट्ट झाले तर थोडे दही परत घाला. ढवळा व झाकण ठेवून अर्धा मिनिट ठेवा. मग गॅस बंद करा.
थोडावेळ तसेच ठेवा. नंतर
एक नंबर दही मिरची भेंडी पानात वाढा. घरात
इतकी आवडेल की कदाचित परत करावी लागेल.
सवडीने एकदा नक्की बनवून
बघा.

No comments:
Post a Comment