हळदी गाजराचे भरीत (रायता)
साहित्य – तीन ते चार कोवळी हळदी गाजरे, तीन ते चार सांडगे मिरच्या, मध्यम आकाराचे एक वाटी थोडेसे आंबट दही, चवीनुसार मीठ,चविसाठी चिमुटभर साखर , दोन टेबल स्पून तेलाची फोडणी,एक छोटा चमचा मोहरी, एक छोटा चमचा हळद,चिमूटभर हिंग.
कृती : आगोदर गाजरे स्वच्छ धुऊन,प्रेशरकुकरमधून चार शिट्ट्यांवर चांगली शिजवून घ्यावीत. थंड झाल्यावर, साले काढून अगदी बारीक चिरुन घ्यावीत . लाकडी मॅशरने चांगली ठेचावी,व घोटून घ्यावी. नंतर त्यात मीठ, दही आणि कुस्करलेल्या सांडग्यामिरच्या घालून गार फोडणी द्यावी.
रंगीत, सुंदर, चविष्ट रायता तोंडी लावणे तयार झाले. हे पोळी-भाकरी बरोबर, पराठ्याबरोबर फारच रुचकर लागते
टिप : गॅसवर एका काढल्यात फोडणी करताना प्रथम सांडगी मिरच्या तळून घेऊन मग त्यातच फोडणी करावी. वेगळे तेल घेऊ नये. मिरच्या ब्राऊन रंगावर तळाव्या. जर मिरच्या कुस्करल्या गेल्या नाहीत तर मिक्सरमध्ये अगदी थोडा वेळ घालून जाडसर काढाव्यात. विकतच्या सांडग्या, मिरच्या घेतल्या तर त्यात दही असते.मिरच्या कडक होतात. हाताने चुरल्या जात नाहीत.
No comments:
Post a Comment