Search This Blog

Tuesday, 21 September 2021

कोथिंबीरीचे डोसे

 

कोथिंबीरीचे डोसे


 

साहित्य : दोन वाट्या ज्वारीचे ताजे पीठ ,  पाव वाटी  बेसन पीठ , पाव  वाटी बारीक रवाअर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर ,दोन टेबलस्पून दही , चवीपुरते मीठ , हिरवी मिरची , लसणाच्या पाकळ्या, जिरे,कढीपत्याची पाने,ओवा व जरुरीनुसार तेल

कृती : एका बाऊल मध्ये  दोन वाट्या ज्वारीचे ताजे पीठ ,  पाव वाटी  बेसन पीठ , पाव  वाटी बारीक रवा भिजत घालून ठेवा.

मिक्सरवर बारीक चिरलेली कोथिंबीर , दही , मीठ , हिरवी मिरची , लसणाच्या पाकळ्या, जिरे,कढीपत्याची पाने आणि ओवा हे एकत्र वाटून त्याची पेस्ट करून घ्या.

बाऊलमध्ये भिजत घातलेले पीठ एका पातेल्यात काढून घेऊन त्यापिठात ही पेस्ट घालून मिक्स करा.

पिठात पाणी घालून डोशासाठी लागते तितपत पातळ पीठ झाले की उबदार जागी १५ मिनिटे झाकून ठेवा.

डोश्यांसाठी गॅसवर डोश्यांचा तवा तापत ठेवून त्यावर मिठाच्या पाण्याचा बोळा/ नारळाची शेंडी किंवा अर्धा कापलेला कांदा  फिरवून घ्या व मग तव्यावर चमचाभर तेल सोडून  मध्यभागी डावभर पीठ घालून डावाने सगळीकडे गोलाकार पसरून घ्या व दोन्ही बाजूंनी भाजून घेऊन डोसा तयार झाला की नारळाच्या चटणी सोबत सर्व्ह करा.

महत्वाची सूचना -प्रत्येकवेळी पातेल्यातून डोश्यांचे पीठ काढताना आजूबाजूचे  पीठ ढवळले जाऊन आतील गॅस बाहेर निघून जाणार नाही याची काळजी घेऊन हलक्या हाताने पीठ घ्या , कारण गॅस / हवा बाहेर निघून गेल्यास डोसे जाळीदार व हलके होणार नाहीत)

No comments:

Post a Comment