तवस काकडीचे लोणचे
काही जण यालाच  कायरस असेही म्हणतात. यात घातलेल्या फेटलेल्या मोहरीमुळे ,हे खातांना  मस्तकात उग्र वास जाऊन जो ठसका लागतो  व नाकातून पाणी येते त्यामुळे याला  ‘नाकारडे’  पण म्हणतात
साहित्य : थोडी जून काकडी एक,मोहरी चार चमचे,मेथी अर्धा चमचा,मिरची एक,लिंबू एक मोठा,तेल,हिंग,हळद,मीठ,साखर आणि दोन चमचे कैरी लोणचे मसाला. 
कृती : 
प्रथम काकडीची  सालं व बिया काढून तिचे बारीक तुकडे करुन घ्या.मोहरी ,मेथी , हिरवी मिरची,हिंग व  थोडे पाणी घालून मिक्सरमध्ये चांगले फेटून घ्या,आणि काकडीच्या तुकड्यामधे घालून मिक्स करा.नंतर दोन चमचे कैरी लोणचे मसाला आणि  चवीनुसार मीठ साखर व लिंबाचा रस घाला.छोट्या कढल्यात तेल घेऊन त्यामधे मोहरी हिंग हळद घालून फोडणी करा व ती काकडीवर ओता.खमंग चटकदार असे काकडीचे लोणचे किंवा कायरस तयार ! 
तुम्ही याला काही ही नांव द्या पण ही डिश लागते फर्मास.
करून बघा आणि नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली ते...

 
No comments:
Post a Comment