Monday 31 May 2021

नीर डोसा

 

नीर डोसा

  



 

कानडीत पाण्याला नीर असे म्हणतात. रात्रभर पाण्यात भिजत घातलेला तांदूळ पाण्यासाकट मिक्सरवर छान बारीक वाटून घेऊन त्या पिठाचा केलेला डोसा म्हणजेच नीर डोसा होय.

करायला एकदम सोप्पा..

साहित्य : एक वाटी इंद्रायणी तांदूळ (उकड्या नको) ,एक टेबलस्पून उडदाची डाळ, १०-१२ मेथी दाणे , मूठभर जाड पोहे , मठभर ओल्या नारळाचा चव ,अडीच वाट्या पाणी , एक चमचा मीठ ,चवीनुसार हिरवी मिरची

कृती : आदल्या रात्री तांदूळ, उडदाची डाळ, मेथी दाणे , जाड पोहे  अडीच वाट्या पाण्यात भिजत घालावेत. सकाळी पाण्यासकट मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक वाटून घ्यावे . हे झाले आपले नीर डोशाचे पीठ तय्यार  !

लगेच त्यात एक  चमचा मिठ व चवीनुसार हिरवी मिरचीचा ठेचा घालायचा व बॅटर मिक्स करून ठेवायचे.

दुसरीकडे गॅसवर  बिडाच्या तव्याला योग्य तापवून,त्यावर थोड़े तेल घालून हे पातळ बनावलेले बॅटर डावाने गोलाकार पसरून टाकावे ...

आणि नारळाच्या चटणी बरोबर हे नीर डोसे सर्व्ह करावेत.


विशेष सूचना : हे नीर डोशाचे बॅटर पातळच  हवे..आणि तवा फिरवून  हे बॅटर डोश्यासारखे गोल करायचे..जेवढे बॅटर पाण्यासारखे पातळ ...डोसा जाळीदार आणि लुसलुषित होणार!

या नीर डोश्याला  fermentation करत नहीत...ग्राइंड केले की लगेच डोसा करायचा.. 

Sunday 30 May 2021

मेदू वडा (उडीद वडा) चटणी

 

मेदू वडा (उडीद वडा) चटणी






 

साहित्य : २वाट्या उडीद डाळ , अर्धी  वाटी मूग  डाळ , अर्धी वाटी चणा (हरबरा)  डाळ , २” लांब आल्याचा तुकडा (किसून) ,चवीनुसार मीठ व बारीक चिरून हिरव्या मिरच्या,५-६ कढीपत्त्याची पाने, बचकभर बारीक चिरलेली कोथिंबीर,वडे तळण्यासाठी आवश्यकते नुसार तेल.

कृती : वड्यासाठी ५-६ तास आगोदर किंवा आदल्या रात्री उडीद डाळ, मूग डाळ व चणा (हरबरा) डाळ धुवून घ्या व व स्वतंत्र पातेल्यात पाण्यात भिजत घालून ठेवा. नंतर या डाळी  पाण्यातून काढून घेऊन पुन्हा एकदा धुवून घ्या व पानी न घालता मिक्सरवर फार बारीक न करता अथवा पेस्ट न होऊ देता वाटून घ्या.

वाटलेल्या डाळीत चवीनुसार मीठ,हिरव्या मिर्च्यांचे बारीक चिरलेले तुकडे,किसलेले आले, कढीपत्त्याची पाने व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व पीठ चांगले हलवून मिक्स करून घ्या. एग बिटारणे पीठ चांगले फेटून घ्या. वाड्यासाठी पीठ स्पजी व हलके होईल असे पहा.

गॅसवर एका कढईत वडे तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. कढईतील तेल चांगले तापल्यावर, आगोदर  हात पाण्यात ओला करून घा व  हातावर वड्याचे एक चमचाभर पीठ घेऊन त्याला गोल वाड्याचा आकार द्या व ओल्या अंगठ्याने दाबून भोक पाडा व तो वडा गरम तेलात सोडा. (हातावर वडे करण्याऐवजी वडे घालण्यासाठी प्लास्टिकचा कागद किंवा केळीचे पानाचा वापर केला तरी चालेल) कढईचा आकार व कढईतील तेलाच्या हिशोबाने एका वेळी  ३-४ वडे तळायला घालावेत . वडे थोडेसे ब्राऊन होताच पलटी करून दुसर्‍या बाजूने सुद्धा ब्राऊन रंगावर तळून घेऊन बाहेर काढून टिश्यू पेपरवर जादाचे तेल शोषण्यासाठी ठेवावेत.

सर्व्ह करतेवेळी हे मेदू वडे कोथिंबीर-नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.

 

 

Saturday 29 May 2021

मिश्र पालेभाज्यांच्या खुखुशीत पुर्‍या

 


मिश्र पालेभाज्यांच्या खुखुशीत पुर्‍या  




 

कृती : आपला नेहमीचा मिक्सर जार घ्या , त्याला आतिल बाजूने  तेल लावा आणि जार मध्ये थोडेसे तेल घाला म्हणजे पीठ जारला आतून चिकटत नाही.

मग त्या जार मध्ये अर्धा जार भरेल एवढी  कणिक (गव्हाचं पीठ)  घाला.  आलं लसूण पेस्ट, मीठ, धना जीरा पावडर, मिरची पावडर किंवा हिरव्या मिरचीचे तुकडे आणि बारिक चिरलेली केणा ,पालक,मेथी, शेपू,रताळी,शेवगा  या   पालेभाज्यांची  पाने (इतर पालेभाज्या उदा. मायाळू,हादगा,मुळे ,मोहरी यांचीही बारीक चिरलेली पाने  घातली  तरी चालतील)  व सोबत कढीपत्ता आणि  कोथिंबीर  यांचीही पाने बारीक चिरून  टाका, वरून थोडे तीळ टाका.

आता अगदी थोडे थोडे पाणी घालत whipping mode वर मिक्सर फिरवत पांच-सहा मिनिटे पीठ मिक्स करायचे, सुरेख मऊ असे पीठ मळून तयार होते.

आता मिक्सरमधून पिठाचा गोळा बाहेर परतीत किवा तसरळ्यांत काढून घ्या    तेलाचा हात लावून परत मळून घ्या. पण पाणी अगदी थोडे थोडे घालायचे.

पीठ दहा मिनिटे मुरल्यावर लिंबा  एव्हढे उंडे करूनपोळपाटावर पुर्‍या लाटून ठेवा.

दुसरीकदे गॅसवर एका कढईत तेल गरम करा. तेल चागले तापले की त्यात पुर्‍या टाळून काढा.

नाश्ता म्हणून लोणी किंवा दह्या सोबत खुसखुशीत , आरोग्यदायी आणि पौष्टिक पुर्‍या सर्व्ह करा.

दुपारच्या चहा सोबत चाऊ-म्याऊ म्हणूनही देता येतात.

टीप :  शेवटी मिक्सर च्या भांड्यात पाणी आणि भांडी धुण्याचा द्रवरूप साबण घालून एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे मिक्सर परत चकाचक...

 

 

Friday 28 May 2021

मिश्र पालेभाज्यांचे आरोग्यदायी ठेपले

 

 

मिश्र पालेभाज्यांचे आरोग्यदायी ठेपले...

 

 


कृती : आपला नेहमीचा मिक्सर जार घ्या , त्याला आतून तेल लावा आणि जार मध्ये थोडेसे तेल घाला म्हणजे पीठ जारला आतून चिकटत नाही मग अर्धा जार भरेल एवढी  कणिक (गव्हाचं पीठ)  घाला.  आलं लसूण पेस्ट, मीठ, धना जीरा पावडर, मिरची पावडर आणि बारिक चिरलेली केणा ,पालक,मेथी,शेपू,रताळी,शेवगा  या   पालेभाज्यांची  पाने (इतर पालेभाज्या उदा. मायाळू,हादगा,मुळे ,मोहरी यांचीही बारीक चिरलेली पाने  घातली  तरी चालतील)  व सोबत कढीपत्ता आणि  कोथिंबीर  यांचीही पाने बारीक चिरून  टाका, वरून थोडे तीळ टाका.

आता अगदी थोडे थोडे पाणी घालत whipping mode वर मिक्सर फिरवत पांच-सहा मिनिटे पीठ मिक्स करायचे, सुरेख मऊ असे पीठ मळून होते.

आता अगदी थोडे थोडे पाणी घालत whipping mode वर मिक्सर फिरवत पांच-सहा मिनिटे पीठ मिक्स करायचे, सुरेख मऊ असे पीठ मळून होते.
आता मिक्सरमधून पिठाचा गोळा बारेर परतीत किवा तसरळ्यांत काढून घ्यायाचा व तेल लावून परत मळून घ्या. पण पाणी अगदी थोडे थोडे घालायचे.
पीठ दहा मिनिटे मुरल्यावर एखाद्या लाडवा एव्हढया आकाराचे उंडे करून ठेपले लाटून आणि तव्यावर थोडेसे तेल सोडून दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या.
नाश्ता म्हणून लोणी किंवा दह्या सोबत सर्व्ह करा.


 

टीप :  शेवटी मिक्सर च्या भांड्यात पाणी आणि भांडी धुण्याचा द्रवरूप साबण घालून एकदा फिरवून घ्यायचे म्हणजे मिक्सर परत चकाचक...

 

Thursday 27 May 2021

इन्स्टंट खमण ढोकळा मिक्स आणि इन्स्टंट खमण ढोकळा मिक्स रेसिपी


 इन्स्टंट खमण ढोकळा मिक्स कसे बनवायचे त्याची रेसिपी आणि ते वापरुन खमण ढोकळा कसा बनवायचा त्याचीही रेसिपी.

साहित्य : एक वाटीभर तांदुळ,तांदुळाच्या निम्मी म्हणजेच अर्धा वाटी हरबर्याची (चणा डाळ),चणा डाळीच्या निम्मी म्हणजेच पाव वाटी उडदाची डाळ, पाव वाटी साखर,एक टेबलस्पून मीठ,एक टेबलस्पून खाण्याचा सोडा,ढोकळ्याला आंबटपणा येण्यासाठी व टिकाऊपणा (Preservative) यावा म्हणून एक टेबलस्पून सायट्रीक अँसिड. १ टेस्पून
कृती : आगोदर तांदुळ व दोन्ही (हरबरा व उडीद) डाळी धुवून आणि सूती पंचावर पसरून सावलीत खडखडीत वाळवून घ्याव्यात. मग हे तिन्ही घटक (तांदूळ व दोन्ही डाळी) एकत्र करून मिक्सरवर वाटून त्यांची पावडर (पीठ) करून घ्यावी.नंतर मिक्सरवर मीठ, साखर, सोडा व सायट्रीक अँसिड हे बाकीचे घटक एकत्र करून मिक्सरमधे फिरवून मिक्स करून घ्या.त्यांची बारीक पावडर करा.
आता या मिक्सरवर तयार करून घेतलेल्या दोन्ही पावडरी एकत्र करून पुन्हा एकदा हलकेच मिक्सरमधून फिरवून घ्यावे.
तयार झालेले इन्स्टंर खमण ढोकळा मिक्सएखाद्या घट्ट झाकणाच्या हवाबंद डब्यात किंवा काचेच्या बरणीत भरून ठेवावे. हे इन्स्टंट मिक्स साधारणत: एक महीन्यापर्यंत छान टिकते. गरजेनुसार हे इन्स्टंट मिक्स वापरुन ढोकळा बनवावा.
टीप : तांदूळ व दोन्ही डाळी आणि इतर घटक पदार्थ म्हणजे मीठ, सोडा, साखर,सायट्रीक अँसिड हे वर सांगितल्याप्रमाणे मिक्सरमधून स्वतंत्रपणे वेगवेगळेच बारीक करावे, अन्यथा पीठात गुठळ्या होऊ शकतात.
ढोकळा बनवण्यासाठी लागणारे साहित्य : एक वाटी इन्स्टंट ढोकळा मिक्स (गरजेनुसार दिलेल्या प्रमाणांत कमी-जास्त करा),एक वाटी (जितके इन्स्टंट पीठ तेव्हढेच) पाणी, चिमुटभर हळद,एक चमचा हिरवी मिरची व ,आलं यांची पेस्ट,फोडणीसाठी तेल,हिंग,मोहरी,पांढरे तिळ, ८-१० कढीपत्त्याची पाने, सजावटीसाठी चिरलेली ताजी कोथिंबीर.
इन्स्टंट ढोकळा बनवण्याची कृती :
प्रथम खमण ढोकळा बनवण्याच्या कुकरमधे तळाशी गरजेइतके पाणी घालून ते गॅसवर गरम करण्यास ठेवावे. ढोकळा पात्राला आतून तेलाचा हात लावून घ्यावा.
आता एका बाऊलमधे इन्स्टंट ढकला मिक्स घेऊन त्यामधे हळद व हिरवीमिरची आणि आलं यांची पेस्ट घालावी व गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घेत गरम पाणी घालून ढवळावे. आता हे तयार मिश्रण झटपट ढोकळा पात्रात ओतून, ढोकळा स्टँड कुकरमधे ठेवावे व गॅसवर पंधरा मिनिट वाफवून घ्यावे.
दुसरीकडे (ढोकळा वाफेपर्यंत) गॅसवर एका काढल्यात फोडणी तयार करून ठेवावी. ढोकळा वाफून तयार झाला की, थोडा थंड झाल्यावर एका थाळीत काढावा, त्यावर फोडणी चमच्याने पसररावी व वरून चिरलेली ताजी कोथिंबीर घालून सुरीला तेलाचा हात लावून कापून ढोकळा चटणीसोबत खायला द्या.
टिप्स :
खमण ढोकळा जर प्रेशर कुकर मधे करणार असाल तर ढोकळा करण्यापूर्वी कुकरच्या झाकणाची रबरी रींग व शिट्टी काढून ठेवा.

आंबा कलाकंद

 

आंबा कलाकंद

 

 


 

साहित्य : गॅसवर एका जाड बुडाचा पॅनमध्ये अर्धा लिटर निरसे म्हशीच्या दुधाची पिशवी सोडून दूध आटायला ठेवायचे.

दुसरीकडे दोन हापुसच्या आंब्यांचा रस काढून ठेवायचा.

 दूध उकळून  आटले की त्यात  आंब्याचा रस घालायचा  आणि सतत ढवळायचे.

उकळत्या दुधात आंब्याचा रस घातला की दूध  नासते.

पण दूध नासले तरीही तसच मोठ्या आंचेवर ढवळत राहायचं.

आता त्यात १०० ग्रॅम पनीर किसून घालायचं व  मोठ्या गॅस वर घट्ट होई पर्यंत ढवळत रहायचं.

नंतर त्यात (आवडीनुसार) दीड ते दोन वाट्या साखर घालायची.

साखर घातली की मिश्रण  परत सैल होते.

मोठ्या आंचेवर ढवळत राहून ते परत घट्ट होऊ द्यायचं.

ढवळतांना  घरात जर दुधाची पावडर असेल तर पाव  वाटी घालावी.

मिश्रण छान घट्ट झालं की पॅनच्या कडे कडेने कोरड होट जाते.

मग स्टीलच्या थाळ्याला आतून सगळीकडे  साजूक तूप लावून त्याच्या वर ते घट्ट होत आलेले गरम मिश्रण पसरायचं.

जरा थंड  झाले की वर ड्राय फ्रूट्स चे बारीक तुकडे घालून हाताने थोडेसे दाबून घेऊन ,सुरीने वड्या पाडून घ्यायच्या आणि थाळा  फ्रीज मध्ये ठेवायचा.

छान रवाळ आंबा कलाकंद तयार होतो.

तीन तासांनी फ्रीज  मधून बाहेर काढून वड्या काढायच्या आणि स्टीलच्या डब्यात भरून ठेवायच्या. 

Tuesday 25 May 2021

ज्वारीच्या भाकरी

 

ज्वारीच्या पीठाच्या गरम पाणी वापरूनही भाकऱ्या नीट होत नसतील तर त्याचाच अर्थ म्हणजे त्या पिठाची विरी(निकस) गेली आहे. अशा वेळी त्या पिठाची उकड काढून भाकरी करा. उकड काढण्यासाठी वाटी ने ज्वारीचे पिठ मोजून त्याच वाटी ने १:१ मोजून पाणी घ्या व चांगली उकळी येऊ द्या. मग मीठ,तेल आणि ज्वारीचे पिठ त्यात मिक्स करून चमच्याने ढवळा आणि गॅस बंद करून घट्ट झाकण ठेवा. ५-१० मिनटे झाकून ठेवा. १० मिनीटांनी उकड परातीत काढून घ्या आणि हाताला पाणी लावून नीट मळा. छोटे गोळे बनवून लहान फुलक्याच्या आकाराचे हलके पिठ लावून लाटा व नॉनस्टिक तव्यावर भाजून घ्या. ही भाकरी अगदी सहज फुलक्या सारखी लाटली जाते. फुलक्यां सारख्या फुगतात.संध्याकाळ पर्यंत पण मऊ रहाते.

आणखी एक प्रयत्न करून पहा,त्या पिठात थोडी कणिक मिसळून पीठ भिजवा, कदाचित भाकरी होईल.

जर पिठाला ग्लूटेनचा प्रॉब्लेम असेल तर उडदाचे पीठ मिसळून प्रयत्न करून पहा.

आणखीन एक पर्याय म्हणजे त्या पिठात राजगिरा पीठ मिक्स करून बघा, छान होतात आणि diet ला पण चालतात.

आमची बाग आमचे ' आनंदनिधान '

 

आमची बाग आमचे ' आनंदनिधान '

 





माणसाला काही तरी छंद हा हवाच. तोच कठीण काळी आपल्याला उपयोगी पडतो.तसे मला फुलांच वेड अगदी लहाणपणा पासूनच आहे , पण तरीही आयुष्याची ४५ वर्षे बागेसाठी जागा नाही आणि १९८५ मध्ये स्वत:चे घर गेऊनही नोकरी व्यवसायात आकंठ बुडालेला असल्यामुळे वेळच मिळत नाही असे म्हणत हयातीची  ६६  वर्ष गेली ......पण  मग २००८ मध्ये  ठरवल की आता आपली आवड,आपला छंद जोपासायचा

आजकाल सर्वत्र फ्लॅट संस्कृती स्वीकारलेली आढळून येत असली तरी प्रत्येकास आपली स्वत:ची छोटीशीच का होईना पण बाग असावी अशी आंतरिक इच्छा तर असतेच ना. हौस म्हणून फळ झाडे नाही तरी किमान काही छोटी छोटी फुलझाडे तरी आपल्या या बागेत असावीत असे प्रात्येकालाच वाटत असते . ही हौस फ्लॅटमधील गॅलरीमध्ये कुंडय़ांत फुलझाडे लावून पूर्ण करायचा आपला नेहमी प्रयत्न असतो.. आपल्या फ्लॅटच्या बाल्कनीतील कुंडय़ांमध्ये आपण हौसेने फुललेली जास्वंद देवाला वाहताना, फुललेला गुलाब किंवा सोनचाफा/अबोली/मोगरा/मदनबाण केसांत माळताना, आमटीला किंवा कढीला फोडणीसाठी आपल्याच कुंडीतील कढीपत्ता घालताना, चटणी-भाजीसाठी आपल्या बागेतील मिरचा,आले,पुदिना अथवा कोथंबिर वापरताना गृहिणीला होणारा अवर्णनिय आनंद हा प्रत्यक्षांत अनुभवयाचा असतो, तो शब्दांत सांगता येत नाही.

आपले घर कितीही छोटे असो किंवा मोठ्ठा बंगला असो , त्यामध्ये किमान एखादा छोटा का होईना,पण बागेचा हरित कोपरा  तरी असावा, हे आपल्यापाकी बहुतेक प्रत्येकाचेस्वप्न असते. आजकालच्या फ्लॅट संस्कृतीच्या जमान्यात बंगला किंवा मोठी घरे ही गोष्ट दुर्मीळच झाली आहे.त्यामुळे छोट्या जागेतच कल्पकतेनं सजावट करता येणे महत्त्वाचे आहे.
तुमची जागा कितीही लहान किंवा मोठी असो, तिथे एक सुंदर बगीचा कसा फुलवता येईल याचाच प्रत्येकजण विचार करत असतो. ह्याला आम्हीही अपवाद नाही.

आमचे आनंद-निधान म्हणजेच आमच्या ८५ वर्षांच्या जुन्या वाड्याच्या गच्चीवरील अवघ्या  १०' x १५' आकाराच्या छोट्याशा गच्चीत आम्ही उभयतांनी उतारवयांत मोठ्या कष्टाने स्वयंपाक घरातल्या ओल्या कचर्याचा वापर करून फुलवलेली आम्हाला नंदनवनाची अनुभूती देणारी पर्यावरणपूरक संपूर्ण सेंद्रिय व जैविक बाग. ज्या बागेत १०० हून जास्त विविध प्रकारची  फुलझाडे,फळझाडे ,भाजीपाल्याची आणि औषडी वनस्पतींची  झाडे जोपासली आहेत.

कोणतीही बाग ही जरी एक बागच असली तरी आपल्या घरची अगदी छोटीशी असलेली बागही आपल्या साठी नंदनवन असते. आपण स्वत: जिवापाड मेहनत घेऊन मोठ्या कष्टाने लावलेल्या व जिवापेक्षा जास्त जपून जोपासलेल्या आणि वाढवलेल्या घराच्या छोट्याशा गच्चीतील मातीविरहित बागेतून मनाला मिळणारा स्वर्गीय आनंद आणि समाधान याची काहीच तोड नसते. ती एक अवर्णनिय अशी अनुभूती असते. काही औरच... अगदी आईला आपल्या नवजात पहिल्या अपत्याकडे  पाहिल्यावर जसं वाटतं ना अगदी तसचं आम्हाला आमच्या बागेकडे, बागेतल्या झाडा-फुलांकडे पाहिल्यावर वाटतं.... सकाळी उठलं अन झाडांपाशी एक तरी फेरी झाली नाही तर दिवसभर आगदी हुरहूर लागुण रहाते, अन एकदा का झाडांपाशी जाऊन,त्यांच्याशी मनीचं हितगुज करून आलं की दिवसभर कसं प्रसन्न वाटतं. बागेतील झाडांशी बोलायला शब्दांची गरज नसते.हौसेला मोल नाही आणि मेहनतीला तोड नाही याची नित्य नवी प्रचिती येते. प्रत्येकाने  घरातल्या कुंडीमध्ये एखादे तरी टोमॅटो, वांगे किंवा मिरची अथवा एखादे पालेभाजीचे रोप लावायलाच हवे........ त्यामुले निसर्गाचे दातृत्व कळेल, शेतकऱ्याचे कष्ट समजतील, अन्नाचे महत्त्व पटेल, आणि सृजनाचा आनंदही मिळेल.

कधी कधी फुललेली छोटी छोटी फुलेही मनाला अपार समाधान देऊन जातात , त्याचे मोलही नाही ठरवता येत. खरी श्रीमंती पैशांत कधीच नसते तर आमची बाग हीच आमची खर्‍या अर्थाने श्रीमंती आहे असे आम्हाला वाटते. आम्ही अशा संपत्तीचे स्वामी आहोत याचा आम्हाला खूप सार्थ अभिमान वाटतो.

 प्रत्येकाच्या व्यक्तीगत आवडी-निवडीचे प्रतिबिंब त्यांच्या बागेत उमटते हे खरे... दैनंदिन रामरगाडयातुन आम्हाला जो काही मोकळा वेळ मिळतो त्यावेळी  मन शांत ठेवण्याचे ठिकाण म्हणजे `आमची बाग आहे.

माझ्या आनंदाचे गोत्र , ओल्या मातीलाही कधी, येई सुगंध.

आमची बाग म्हणजे आमचे ' आनंदनिधान '  आहे.

आमच्या या छोट्याशा नंदनवनांत भलेही गुलाबांचे किंवा अन्य फुलांचे भरगच्च ताटवे नसतील पण जे काही फुलते त्यांत आम्ही खूपच आनंदी आहोत.

यावेळी मला शांता शेळक्यांच्या कवितेतल्या खालील ओळी आठवतात.

सहज फुलू द्यावे फूल, सहज दरवळावा वास l
अधिक काही मिळवण्याचा करू नये अट्टाहास ll
पराग, देठ, सुवास, पाकळ्या फूल इतकीच देते ग्वाहीl
अलग अलग करू जाता हाती काही उरत नाही ll

आम्ही तर खात्रीने सांगू की ह्या झाडा फुलांनी आम्हांला समृद्ध केल.. #जगायची #इच्छा#फुलण्याचा #ध्यास आणि देता येईल तेवढे #देण्याची #दानत ह्या गोष्टींनी आज आम्ही समृद्ध जीवन व्यतीत करत आहोत.

बागकाम हाच आमचा ऑक्सीजन

वृक्ष सानिध्य हीच आमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा

 

सौ. अनीता व प्रमोद तांबे व प्रमोद लक्ष्मण तांबे, पुणे  दूरध्वनी : (०२०) २४४७ ४७८३ कर्णपिशाच्च (मो) ९७३०९ ८८७११ ,८४४६३ ५३८०५