मॅंगो लस्सी
साहित्य : अर्धा
किलो मलईचे दही,चार हापूस आंब्याच्या छोट्या
छोट्या फोडी,दोन कप दूध, १२ ते १५ काड्या केशर (२ टेबल स्पून दुधात भिजवून ) , दोन वाट्या साखर,एक छोटा चमचा वेलकी पूड, सजावटीसाठी चार टेबलस्पून बदाम-पिस्त्याची भरड
कृती :
प्रथम मिक्सरच्या ब्लेंडरच्या भांड्यात हापूस आंब्याच्या छोट्या छोट्या फोडी घालून
ब्लेंड करून घ्या. मग त्याच मिक्सरच्या भांड्यात दही, दूध,साखर, दुधात
भिजवलेले केशर व वेलची पूड घालून सर्व साहित्य एकजीव होईपर्यंत फिरवून घ्या .
तयार लस्सी एक तास फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवा
.
थंड झाल्यावर लस्सी सर्व्ह करतेवेळी सर्व्हिंग ग्लासेसमध्ये
ओतून घ्या व वरून बदाम पिस्त्याची भरड घालून सजवून सर्व्ह करावी.
No comments:
Post a Comment