केळीच्या खोडाची भाजी
केळीच्या खोडायच्या वरची सर्व
आवरणं काढून टाकायची आणि फक्त मधला दांडा भाजीला घ्यावा. त्याला उभा आणि आडवा
चिरून त्याचे खूप खूप छोटे तुकडे करायचे. तुकडे करता करता लगेच त्याचे धागे बाजूला
काढून ते तुकडे मीठ घातलेल्या पाण्यात किंवा ताकात टाकायचे. एक रात्रभर भिजू द्यायचे. भाजी करताना भाजीला हळद, कांदा, आलं, लसूण वगळून फक्त चमचाभर मोहरी आणि उडद डाळ,
सुकी लाल मिरची, कढीपत्ता यांची फोडणी
द्यायची. नंतर भाजी चांगली शिजली की खोवलेल्या नारळाच्या चवात चांगली घोळवायची.पुन्हा एक दरदरून वाफ काढून झाकून
ठेवावी. वाफ जिरळी की भाही सर्व्ह करावी. ह्या भाजीने रक्त शुद्ध होतं.
No comments:
Post a Comment