Search This Blog

Thursday, 13 May 2021

भाजलेल्या कारल्याची जरा हटके भाजी



भाजलेल्या कारल्याची जरा हटके भाजी
कार्ल्याच्या भाजीची एक आगळी वेगळी पद्धत.गावाकडची.
आज दाखवणार आहे ती कारल्याची भाजी अस्सल गावाकडच्या एकदम हटके पद्धतीची आहे.
साहित्य : ४-५ कोवळी कारली,एक कांदा,डावभर तेल,दोन मोठे चमचे शेंगदाण्याचे भरड कूट, फोडणीसाठी हळद,हिंग,मोहरे,जिरे,गोडा मसाला, चवीनुसार तिखट ,मीठ आणि चवीपुरती चिमुटभर साखर
कृती : कारली गॅसवर सगळ्या बाजूंनी चांगली खरपूस भाजून घ्या. भाजलेल्या कारल्यांच्या बियांसह काचर्या चिरून घ्या. एक मोठा कांदा ऊभाच चिरुन घ्या.
आता गॅसवर कढईत तेल तापवून ,फोडणी करा आणि त्या खमंग फोडणीत उभा चिरलेला कांदा आणि भाजलेल्या कारल्याच्या चकत्या घाला. भाजीत तिखट मीठ गोडा मसाला दाण्याचे कुट व चिमूटभर साखर घालून भाजीला एक दणदणून वाफ काढा.
भाजी तय्यार.
अप्रतिम चवीची भाजी अगदी बियासुद्धा टेस्टी लागतात.
तळटीप : भाजल्याने कारल्याच्या बिया छान शिजतात आणि भाजी मिळून येते.

कांदा आणि शेंगदाण्याचे कूट न घालताही भाजी छानच होते. 

No comments:

Post a Comment