मिश्र पीठांचे भाज्या घालून पौष्टिक थालीपीठ
साहित्य
: एका परातीत प्रत्येकी एक वाटी कणिक व ज्वारीचे पीठ, प्रत्येकी अर्धी वाटी
तांदूळाची पिठी व चणा/हरबरा डाळीचे पीठ (बेसन) ही चार प्रकारची प्रकारची पिठे घ्या.
त्यात चिरलेला कांदा, गाजराचा कीस , बटाट्याचा कीस,बारीक
चिरलेली सिमला मिरची, चिरलेली मेथी आणि आरोग्यदायी केनाची पाने व आलं,लसूण,मिरची यांचे वाटण घाला. चवी पुरते मीठ ,हळद,हिंग,जीरे
,तीळ आणि एक मूठभर खोवलेला नारळ सगळे एकत्र करून पाणी घालून
थालीपीठा ला भिजवतो तसे पीठ भिजवायचे. गॅस
वर पॅन ला तेल लावून थालिपीठा सारखे थापून तव्यावर दोनीही कडून तेल सोडून झाकण
ठेवून छान खरपूस भाजून घ्यावें. दह्यात चवीपुरते मीठ साखर घालून लाल मिरचीचे तिखट ,जीरे आणि साजूक तुपाची फोडणी देऊन मसाला दही करावे व त्यासोबत
हे मिश्र पिठाचे भाज्या घालून बनवलेले पौष्टिक व रुचकर थालीपीठ सर्व्ह करा
No comments:
Post a Comment