Tuesday 25 May 2021

ज्वारीच्या भाकरी

 

ज्वारीच्या पीठाच्या गरम पाणी वापरूनही भाकऱ्या नीट होत नसतील तर त्याचाच अर्थ म्हणजे त्या पिठाची विरी(निकस) गेली आहे. अशा वेळी त्या पिठाची उकड काढून भाकरी करा. उकड काढण्यासाठी वाटी ने ज्वारीचे पिठ मोजून त्याच वाटी ने १:१ मोजून पाणी घ्या व चांगली उकळी येऊ द्या. मग मीठ,तेल आणि ज्वारीचे पिठ त्यात मिक्स करून चमच्याने ढवळा आणि गॅस बंद करून घट्ट झाकण ठेवा. ५-१० मिनटे झाकून ठेवा. १० मिनीटांनी उकड परातीत काढून घ्या आणि हाताला पाणी लावून नीट मळा. छोटे गोळे बनवून लहान फुलक्याच्या आकाराचे हलके पिठ लावून लाटा व नॉनस्टिक तव्यावर भाजून घ्या. ही भाकरी अगदी सहज फुलक्या सारखी लाटली जाते. फुलक्यां सारख्या फुगतात.संध्याकाळ पर्यंत पण मऊ रहाते.

आणखी एक प्रयत्न करून पहा,त्या पिठात थोडी कणिक मिसळून पीठ भिजवा, कदाचित भाकरी होईल.

जर पिठाला ग्लूटेनचा प्रॉब्लेम असेल तर उडदाचे पीठ मिसळून प्रयत्न करून पहा.

आणखीन एक पर्याय म्हणजे त्या पिठात राजगिरा पीठ मिक्स करून बघा, छान होतात आणि diet ला पण चालतात.

No comments:

Post a Comment