Thursday 27 May 2021

आंबा कलाकंद

 

आंबा कलाकंद

 

 


 

साहित्य : गॅसवर एका जाड बुडाचा पॅनमध्ये अर्धा लिटर निरसे म्हशीच्या दुधाची पिशवी सोडून दूध आटायला ठेवायचे.

दुसरीकडे दोन हापुसच्या आंब्यांचा रस काढून ठेवायचा.

 दूध उकळून  आटले की त्यात  आंब्याचा रस घालायचा  आणि सतत ढवळायचे.

उकळत्या दुधात आंब्याचा रस घातला की दूध  नासते.

पण दूध नासले तरीही तसच मोठ्या आंचेवर ढवळत राहायचं.

आता त्यात १०० ग्रॅम पनीर किसून घालायचं व  मोठ्या गॅस वर घट्ट होई पर्यंत ढवळत रहायचं.

नंतर त्यात (आवडीनुसार) दीड ते दोन वाट्या साखर घालायची.

साखर घातली की मिश्रण  परत सैल होते.

मोठ्या आंचेवर ढवळत राहून ते परत घट्ट होऊ द्यायचं.

ढवळतांना  घरात जर दुधाची पावडर असेल तर पाव  वाटी घालावी.

मिश्रण छान घट्ट झालं की पॅनच्या कडे कडेने कोरड होट जाते.

मग स्टीलच्या थाळ्याला आतून सगळीकडे  साजूक तूप लावून त्याच्या वर ते घट्ट होत आलेले गरम मिश्रण पसरायचं.

जरा थंड  झाले की वर ड्राय फ्रूट्स चे बारीक तुकडे घालून हाताने थोडेसे दाबून घेऊन ,सुरीने वड्या पाडून घ्यायच्या आणि थाळा  फ्रीज मध्ये ठेवायचा.

छान रवाळ आंबा कलाकंद तयार होतो.

तीन तासांनी फ्रीज  मधून बाहेर काढून वड्या काढायच्या आणि स्टीलच्या डब्यात भरून ठेवायच्या. 

No comments:

Post a Comment