मेदू वडा (उडीद वडा) चटणी
साहित्य : २वाट्या
उडीद डाळ ,
अर्धी वाटी मूग डाळ , अर्धी वाटी चणा
(हरबरा) डाळ , २”
लांब आल्याचा तुकडा (किसून) ,चवीनुसार मीठ व बारीक चिरून
हिरव्या मिरच्या,५-६ कढीपत्त्याची पाने, बचकभर बारीक चिरलेली कोथिंबीर,वडे तळण्यासाठी
आवश्यकते नुसार तेल.
कृती : वड्यासाठी ५-६
तास आगोदर किंवा आदल्या रात्री उडीद डाळ, मूग डाळ व चणा (हरबरा) डाळ धुवून घ्या व व स्वतंत्र पातेल्यात पाण्यात
भिजत घालून ठेवा. नंतर या डाळी पाण्यातून
काढून घेऊन पुन्हा एकदा धुवून घ्या व पानी न घालता मिक्सरवर फार बारीक न करता अथवा
पेस्ट न होऊ देता वाटून घ्या.
वाटलेल्या डाळीत
चवीनुसार मीठ,हिरव्या
मिर्च्यांचे बारीक चिरलेले तुकडे,किसलेले आले, कढीपत्त्याची पाने व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व पीठ चांगले हलवून
मिक्स करून घ्या. एग बिटारणे पीठ चांगले फेटून घ्या. वाड्यासाठी पीठ स्पजी व हलके
होईल असे पहा.
गॅसवर एका कढईत वडे
तळण्यासाठी तेल गरम करून घ्या. कढईतील तेल चांगले तापल्यावर, आगोदर हात
पाण्यात ओला करून घा व हातावर वड्याचे एक
चमचाभर पीठ घेऊन त्याला गोल वाड्याचा आकार द्या व ओल्या अंगठ्याने दाबून भोक पाडा
व तो वडा गरम तेलात सोडा. (हातावर वडे करण्याऐवजी वडे घालण्यासाठी प्लास्टिकचा
कागद किंवा केळीचे पानाचा वापर केला तरी चालेल) कढईचा आकार व कढईतील तेलाच्या
हिशोबाने एका वेळी ३-४ वडे तळायला घालावेत
. वडे थोडेसे ब्राऊन होताच पलटी करून दुसर्या बाजूने सुद्धा ब्राऊन रंगावर तळून
घेऊन बाहेर काढून टिश्यू पेपरवर जादाचे तेल शोषण्यासाठी ठेवावेत.
सर्व्ह करतेवेळी हे
मेदू वडे कोथिंबीर-नारळाच्या चटणीसोबत सर्व्ह करावेत.
No comments:
Post a Comment