Saturday 31 August 2013

टोमॅटोचे आमलेट

टोमॅटोचे आमलेट 



साहित्य : एक मोठ्ठा टोमॅटो,एक मोठ्ठा कांदा,कोथिंबीर,हिरव्या मिरच्या,जिरे-धने पावडर,चवीपुरती साखर व मीठ आवश्यक तेव्हढे बेसन (चणा डाळ) पीठ  , २-३ चमचे तांदळाचे पीठ व तेल.
कृती : प्रथम टोमॅटो ,कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्या,चवीनुसार हिरव्या मिरच्यांचे तुकडे करून घ्या. एका पातेल्यात बेसन पीठ,तांदळाचे पीठ घ्या,त्यात बारीक चिरलेले टोमॅटो,कांदे व कोथिंबीर , हिरव्या मिरचयांचे तुकडे,जिरे-धने पावडर चवीनुसार साखर आणि मीठ घालून सरबरीत होईल इतपत पाणी घाला व मिश्रण डावाने चांगले एकजीव करून घ्या. गॅसवर तवा ठेऊन चांगला तापल्यावर त्यावर ओला कापलेला कांदा फिरवून घ्या व नंतर चमचाभर तेल टाकून त्यावर डावाने आमलेट टाका. थोड्या वेळाने उलटे करून दुसर्‍या बाजूने तयार करून घेऊन टोमॅटो सॉस बरोबर गरम आमलेटसर्व्ह करा 

Friday 30 August 2013

दही हंडीतील काल्याचा प्रसाद "गोपाळ काला "

 "गोपाळ काला "



साहित्य : १ वाटी जाड पोहे , १ वाटी ज्वारीच्या लाहया , अर्धी वाटी चुरमुरे , १ वाटी ओल्या नारळाचा खोवलेला चव , साले काढून व बारीक चिरलेले काकडीचे तुकडे  १ वाटी , हिरव्या दोन मिरचयाचे बारीक तुकडे , एका बारीक तुकडा आल्याचा कीस , १ चमचा जिरे, दोन कप दही , अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर , चविसाठी साखर व मीठ व फोडणीसाठी एक मोठा चमचा साजूक तूप.

कृती : सर्वात प्रथम पोहे पाणी घालून ५-१० मिनिटे भिजवून घ्या॰ नंतर एक मोठे पातेले घेऊन त्यात हे भिजलेले पोहे घेऊन त्यात लाहया,चुरमुरे,ओल्या नारळाचा चव.बारीक चिरलेले काकडीचे तुकडे,दही,बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीपुरती साखर व मीठ घालून सर्व चांगले एकत्र कालवा. नातर एका  पॅनमध्ये साजूक तूप घालून गरळ झाल्यावर त्यात जिरे ,आल्याचा कीस व हिरव्या मिरचयांचे तुकडे घालून फोडणी / तडका करून तो ह्या मिश्रणावर घालून चांगले हलवून घ्या,
हा काला सर्वांनी मिळून गोकुळ अष्टमीचा प्रसाद म्हणून खायचा असतो व तो लागतोही फारच चविष्ट !!!  

   

Thursday 29 August 2013

मसाले भात

मसाले भात



साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ,१/४ वाटी दही,१/२ वाटी उभी चिरलेली तोंडली,५-६ श्रावण घेवाड्याच्या लांब चिरलेल्या शेंगा,४-५ फ्लॉवरचे तुरे,वांग्याचे काप किंवा फोडी , एक बटाटा फोडी करून ,एक कांदा उभा चिरून (काप),१/४ वाटी ताजा हिरवा मटार,१/२ वाटी कोथिंबीर,१/२ वाटी किसलेले ओले खोबरे,१/२ चमचा लाल तिखट,१/२ चमचा गोडा मसाला,८-९ काजू पाकळ्या ,दोन मसाला वेलदोडे , २ लवंगा,१ दालचिनी,५-६ कढी पत्ता पाने ,१/४ चमचा मोहोरी, चिमुटभर हिंग,१ चमचा साजूक तूप,चवीप्रमाणे मीठ
कृती
   चाळणीतून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व पाणी निथळून घ्यावे ,त्यात लाल तिखट, गोडा मसाला, घट्ट                 मलाईचे दही घालुन १५ मिनिटे मुरत ठेवणे॰                  
प्रेशर कुकरमध्ये साजूक तूप घालुन त्यात हळद,जिरे व मोहोरीची फोडणी करुन घ्यावी व त्यात हिंग, कढीपत्ता, दालचिनी,मसाल्याचे वेलदोडे आणि काजूच्या पाकळ्या घालुन एक दोन मिनिट परतणे,नंतर त्यात  उभी चिरलेली तोंडली, श्रावण घेवडा,फ्लॉवर,वांग्याचे काप,बटाट्याच्या फोडी,कांद्याचे काप घालुन अजून दोन मिनिटे परतून घेऊन मग त्यात धुतलेले तांदूळ, हिरवा मटार आणि मीठ घालुन दोन मिनिट परतणे.नंतर त्यात  २ वाट्या पाणी घालुन कुकरचे झाकण लावून चार शिट्ट्या काढणे.
वाढतेवेळी मसाले भातावर ओले खोबरे व  बारीक कोथिंबीर आणि त्यावर साजूक तूप सोडून देणे.


Wednesday 28 August 2013

मालपोवा

मालपोवा





साहित्य : १ वाटी साखर. १.५  वाटी चाळलेली कणीक. ४ मोठे चमचे दही, १०-१५ नग गव्हाचे पोहे,दूध,पाणी  
कृती : एका पातेल्यात १/२ दूध व १/२ पाणी घ्या, त्यात दही,साखर घाला व मिश्रण चांगले फेटून घ्या व नंतर त्यात चाळलेली कणीक घालून डोशासारखे सरबरीत होईल असे बघा व हलके होण्यासाठी रूबवून घेऊन नंतर त्यात १०-१५ नग गव्हाचे पोहे घाला व पीठ चांगले फुगून वर येण्यासाठी पातेले २-२.५ तास ताटाने झाकून ठेवा. 
कढईत तेल घालून मध्यम आंचेवर उकळे पर्यंत गरम करून घ्या व गरम तेलात एका मोठ्या डावाने पीठ गोलाकाऱ ५-६ इंच आकारात पुरी प्रमाणे टाका. विशेष म्हणजे तो गोल गोळा प्रथम कढईच्या तळाला जाईल व नंतर गोल पुरी सारखा होऊन वर तेलाच्या पृष्ठभागी येईल.सोनेरी रंगावर तळून घ्या व चाळणीत काढून घेऊन निथळून घ्या.
पिस्ते व क्रीम घालून सर्व्ह करा.   







Tuesday 27 August 2013

चिरोटे

चिरोटे 


साहित्य : २ वाट्या चाळलेला मैदा,पाव वाटी बारीक रवा,अर्धा चमचा मीठ,१ मोठा चमचा वनस्पती तूप   (मोहनसाठी) , १ मोठा चमचा दही,व पीठ भिजवण्यासाठी जरुरीपुरते थोडेसे दूध

 साठा तयार करण्यासाठी साहित्य : २ चमचे वनस्पती तूप (साजूक नको) व २ चमचे तांदळाची पिठी  अथवा  कॉर्नफ्लॉअर  

  
    पाक करण्यासाठी साहित्य : दिड वाटी साखर व ती बुडेपर्यंत पाणी, अर्ध्या लिंबाचा रस,  वेलदोडयाची पूड                                                                                                                              
कृती : एक मोठा स्टीलचा थाळा घ्या व त्यात वनस्पती तूप घालून चांगले फेटा,त्यात तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लौअर घालून पुन्हा फेटा.हा झाला साठा.आता एक जाड बुडाचे स्टीलचे पातेले घ्या व त्यात साखर व ती बुडेल एव्हढे पाणी घालून पातेले गॅसवर ठेवा व डावाने एकसारखे हलवत रहा.साखर विरघळून उकळी आल्यावर घट्टसर पाक होऊ द्या.लाडवाप्रमाणे दोनतारी पाक झाल्यावर गॅस बंद करावा व गार होईपर्यंत दवाने धावलात राहावे.पाक जरा गार झाल्यावर त्यात वेलदोड्याची पूड व अर्ध्या लिंबाचा रस घालून ढवळा.एका परातीत मैदा,बारीक रवा,पातळ गरम वनस्पती तूप,मीठव दही घेवून ते सर्व मैदयास चोळून लावावे व जरुरीपुरते दूध घालून भिजवून घट्ट गोळा करा व १५-२० मिनिटे झाकून ठेवा व नंतरच चिरोटे करावयास घ्या.
प्रथम भिजवलेल्या गोळ्याचे तीन सारखे गोळे करून प्रत्येक गोळ्याची पोळपाटावर थोडीशी तांदळाची पिठी लावून पातळ पोळी लाटून घ्यावी.एक पोळी पोळपाटावर ठेवून त्यावर तयार केलेले साटे सगळीकडे सारखे लावून घ्यावे व त्यावर दुसरी पोळी ठेवून पुन्हा सगळीकडे सारखे साटे लावून त्यावर तिसरी पोळी ठेवावी व उरलेले साटे सगळीकडे लावून गुंडाळी करावी व सुरीने सारख्या अंतरावर कापून लाट्या बनावाव्या.कापलेला भाग वर येईल अशी एकेक लाटी ठेवून पुरी सारखी लाटून घ्यावी. 

Vriksha Nursery: Biological solutions for getting rid of mosquitoes...

Vriksha Nursery: Biological solutions for getting rid of mosquitoes...: In mumbai we think the best way to get rid of mosquitoes is either the *BMC Fumingation man* or the various cannisters , tubes of mosquito ...

Monday 26 August 2013

दुधी हलवा

दुधी  हलवा


साहित्य : कोवळा दुधी भोपळा १ किलो,दूध १ लीटर,ताजा खवा ५०० ग्राम,साखर ५०० ग्राम,वेलदोडयाची पूड १ चमचा,अमूल दुधाची पावडर १०० ग्राम,काजू-बदाम-बेदाणे-प्रत्येकी २५ ग्राम व साजूक तूप २ चमचे

कृती : प्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून व पुसून साले काढून किसणीवर त्यांचा कीस काढून घ्या.आता एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात २ चमचे साजूक तूप घालून दुधीचा कीस पूर्ण कोरडा होईपर्यंत परतून घ्या.मग त्यात आधी खरपूस परतून घेतलेला खवा घाला व दोन्ही चांगले एकजीव झाल्यावर अमूलची दूध पावडर,दूध,साखर व वेलदोडयाची पावडर घाला व मंद आचेवर शिजायला ठेवा.शिजून हलवा घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करून त्यात बारीक तुकडे केलेली ड्राय फ्रूट्स (काजू,बदाम,बेदाणे इये.)घालून हलवा व एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊन सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा.
सर्व्ह करतेवेळी वरुन थोडे ड्राय फ्रूटचे तुकडे घालून द्या.

Sunday 25 August 2013

सुरळीच्या वड्या

सुरळीच्या वड्या




साहित्य : १ वाटी चणा डाळीचे पीठ (बेसन),१ वाटी आंबट ताक,१ वाटी पाणी,चवीसाठी मीठ व लाल तिखट,थोडी हळद,फोडणीसाठी तेल,हिंग व मोहरी व वरुन सजावटीसाठी  नारळाचा चव (खोवलेला नारळ),बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती : प्रथम एका पातेल्यात बेसन,आंबट ताक व पाणी एकत्र करून ढवळून घ्यावे व पातेले गॅसवर ठेवावे त्यात थोडी हळद व चवीनुसार मीठ व लाल तिखट घालून शिजवून घ्यावे. शिजत असताना एकसारखे (न थांबता) ढवळत रहावे व गुठळी होऊ देऊ नये.मिश्रण चांगले शिजले की गरम असतानाच एका स्टीलच्या थाळ्याला मागील बाजूस तेलाचे हलके बोट फिरवून त्यावर  तेलाच्या हातानेच पातळ पसरावे व थंड होऊ द्यावे.
गार झाल्यावर त्याची गुंडाळून सुरळी करून त्याचे ३/४” मापाचे कापून तुकडे करून एका पसरट ताटात किंवा डिशमध्ये काढून घ्या व त्यावर फोडणी, नारळाचा चव व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व एका छोट्या बशीतू अगर बाऊल मधून सर्व्ह करा. 

Saturday 24 August 2013

उपवासाची साबूदाण्याची खिचडी

उपवासाची साबूदाण्याची खिचडी 



साहित्य : १ वाटी चांगल्या प्रतीचा साबुदाणा, १ मूठभर शेंगदाण्याचे भरड कूट, १ मध्यम आकाराचा बटाटा (कच्चा किंवा उकडलेला कसाही चालेल), १-२ हिरव्या मिरच्या तुकडे करून, पाउण ते १ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे, साजूक तूप/तेल ५-६ चमचे, मीठ, साखर, अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर व २-३ चमचे खवलेला ओला नारळ
कृती : साबुदाणा पाण्याने धुवून २-३ तास भिजत घालावा.पाणी पूर्ण काढून घेऊन व थोडेसे दूध घाला  म्हणजे जास्त चांगला भिजेल. कच्चा बटाट्याची साले काढून त्याचे काचऱ्या चिरतो तसे पातळ काप करून मिठाच्या पाण्यामध्ये घाला.(किंवा उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घ्या) गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा. त्यात तेल/साजूक तूप घालून ते पूरेसे तापले म्हणजे त्यात जिरे घाला, ते तडतडले की त्यात हिरव्या मिरच्यांचे चिरलेले तुकडे घाला व पातळ चिरलेले
कच्या बटाट्याचे काप घाला .(किंवा उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला) पुन्हा परता. कच्या बटात्याचे काप घालताना त्यातले मिठाचे पाणी काढून टाका. त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवून बटाटे वाफवून घ्या. ते शिजले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा परता. आता गॅस मंद करा. त्यात थोडेसे मीठ पेरून परत थोडे परता. आता भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने मोकळा करून घ्या. त्यात लाल तिखट,चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर व शेंगदाण्याचे भरड कूट घालून चांगले मिसळून घ्या. व हे मिश्रण कढईत घालून उलथण्याने सगळीकडून खिचडी चांगली ढवळा. नंतर त्यावर झाकणात थोडे पाणी घालून झाकून ठेवून १-२ मिनिटे वाफवून घ्या. असे एक दोन वेळा करा, म्हणजे साबुदाणा चांगला शिजेल व त्याचा रंगही बदलेल. कालथ्याने खिचडी परत परत व्यवस्थित ढवळा म्हणजे मोकळी होईल. गोळा होणार नाही. तेल/तूप कमी वाटले तर वरून थोडे घालून ढवळणे.
साबुदाणा भिजवल्यावर दर अर्ध्या तासाने मोकळा करून घ्या. दोन बोटांच्या चिमटीत साबुदाणा धरून तो व्यवस्थित भिजला आहे ना याची खात्री करून घ्या. भिजला नसेल तर थोडासा पाण्याचा हबका मारून त्यावर परत झाकण ठेवा.
टीप ; साजूक तूपातील खिचडी सर्वात जास्त चविष्ट होते.

Friday 23 August 2013

पालक-बटाटा कटलेट.

पालक-बटाटा कटलेट.


साहित्य : - ४/५ बटाटे,पालक,आले-लसूण पेस्ट,हिरवी मिरची,खसखस,पांढरे तीळ,२/३ ब्रेड स्लाईस,चाट मसाला (पाहिजे असल्यास)मीठ,जिरे-धने पूड,बारीक रवा व तेल 

कृती : - प्रथम बटाटे उकडून घ्यायचे.उकडलेले बटाटे गरम असताना किसून घ्यायचे.त्यात पालक चिरून घालायचा.नंतर लसूण-मिरची बारीक वाटायची आणि ती त्या मिश्रणात घालायची.पाहिजे असल्यास चाट मसाला घालायचा.शिळा ब्रेड बारीक करून तो पण पालक-बटाट्याच्या मिश्रणात घालायचा.जिरेपूड,धनेपूड,बारीक बारीक करून तो पण पालक-बटाट्याच्या मिश्रणात घालायचा.जिरेपूड,धनेपूड,बारीक चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मिरचीचा ठेचा,साखर,लिंबाचा रस व मीठ घालून एकजीव मळून घ्यायचे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट बनवायचे.आणि बारीक रवा लाऊन तव्यावर थोडेसे तेल सोडून फ्राय करायचे.ब्रेड घातल्याने खुसखुशीत लागतात.पालक नसेल तर दुसरी कोणतीही भाजी घालू शकतो.लहान मुले आवडीने खातात आणि मुख्य म्हणजे त्यांच्या पोटात सर्व भाज्या जातात.चटणी/टोमॅटो केचप बरोबर छान लागतात.




Thursday 22 August 2013

17 Apart: How To: Plant Seeds Using Eggshells

17 Apart: How To: Plant Seeds Using Eggshells: We were excited when our Sprout Robot alert went off that it was time to start broccoli seeds indoors this weekend for our zip code. Wi...

चमचमीत चटकदार पचडी



साहित्य : काकडी (चोचवलेली),गाजर (किसून),फ्लौवरचे छोटे तुरे ,कोबी (बारीक चिरून),कांदा पात बारीक किरून,पालकाची पाने (बारीक चिरून),कांदा व टोमॅटो (बारीक चिरून),मोड आलेले मूग व मटकी,सॅलडची पाने (बारीक चिरून),मेथीची पाने (चिरून),बीट (किसून),अर्ध्या लिंबाचा रस,शेंगदाण्याचे कूट ३ मोठे चमचे,चवीनुसार लाल तिखट,साखर व मीठ,फोडणीसाठी तेल व हळद,जिरे,हिंग,मोहोरी
कृती : प्रथमवर दिलेल्या सर्व प्रकारच्या भाज्या स्वच्छ धुवून व वर सांगितल्याप्रमाणे चिरून अगर किसून हव्या त्या प्रमाणात एका तसराळयात एकत्र करा,त्यात थोडेसे मोड आलेले मूग व मटकी मिसळा,त्यावर ३ मोठे चमचे शेंगदाण्याचे कूट, अर्ध्या लिंबाचा रस,चवीनुसार साखर व मीठ घालून चांगले मिक्स करा,नंतर त्यावर चवीनुसार लाल तिखट घालून त्यावर चंगी गरम फोडणी द्या व पुन्हा एकदा चालगे मिक्स करा.झाली चमचमीत पचडी तय्यार !!!  

श्रावण घेवाड्याची भाजी (फरसबी)



साहित्य : श्रावण घेवड्याच्या  शेंगा (फरसबी) २५० ग्राम, २-३ चमचे ओल्या नारळाचा चव,भाजीत घालण्यासाठी २-३ चमचे मोड आलेली मटकी (ह्याला वैंजण असे म्हणतात)   चवीप्रमाणे २-३ हिरव्या मिरचयांचे तुकडे,मीठ,साखर/गूळ, २ चमचे शेंगदानयाचे जाडसर कूट,१ चमचा गोडा (काळा) मसाला,थोडीशी चिरलेली कोथिंबीर,फोडणीसाठी २ चमचे तेल,जिरे-मोहोरी,हळद,हिंग व कढी पत्त्याची पाने



Wednesday 21 August 2013

ओल्या नारळाची हिरवी चटणी



साहित्य : अर्ध्या नारळाचा चव,अर्धी जुडी कोथिंबीर निवडून,धुवून व चिरून,अर्ध्या लिंबाचा रस,४-५ लसणाच्या पाकळ्या,एक छोटा आल्याचा तुकडा,४-५ हिरव्या मिरच्यांचे तुकडे,४-५ कढीपत्त्याची पाने,मूठभर भाजलेले शेंगदाणे,एक चमचा साखर,एक छोटा चमचा मीठ,अर्धा कांदा बारीक चिरून
कृती : वरील सर्व साहित्य एकत्र करून मिक्सरच्या भांड्यात घाला व आवश्यक असेल तसे पाणी घालून मिक्सर मधून फिरवून घ्या.चव बघून आवश्यक वाटल्यासा जरुरीप्रमाणे आंबट,तिखट,गोड अगर खारट चव वाढवा.  

Tuesday 20 August 2013

“अळूच्या वड्या”





साहित्य : मोठ्ठी वड्यांच्या अळूची ४/५ पाने स्वच्छ धुवुन, १ वाट्या चणा डाळ (बेसन) पीठ, १ चमचा तांदुळाची पिठी, १/४ वाटी चिंचेचा घट्टसर कोळ, २ चमचे गुळ, १/४ चमचा हळद, २ चमचे लाल तिखट, १ चमचा तीळ, १ चमचा ओवा, १ चमचा धने जि-याची पूड, चवीपुरते मीठ, तळणी साठी तेल

कृती : प्रथम ळूची पाने स्वच्छ पुसून त्याचे देठ कापून घ्यावेत. प्रत्येक स्वतंत्र पान मागील बाजूने त्यावर लाटणे फ़िरवुन सपाट करुन घ्यावे.
नंतर एका तसराळ्यामध्ये बेसन पीठ घेन त्यातच तांदुळपिठी घालावी.नंतर त्यात एकेक करत हळद, लाल तिखट, मीठ ,धने-जिरे पुड,चिंचेचा कोळ,१चमचा तेल, ओवा, तिळ हे सगळे जिन्नस घालून मिक्स करावे. घट्टसर भिजवावे. जरुरी असल्यास थोडे पाणी घालावे.मिश्रण फ़ार पातळ आणि फ़ार घट्ट होणार नाही याची काळजी घ्यावी.
आता हे मिश्रण अळूच्या उलट्या पानावर पातळ थर बसेल असे नीट पसरावे. आता अळूचे दुसरे पान त्यावर तसेच पालथे ठेवावे.आणि परत एकदा मिश्रणाचा पातळ थर पसरावा. असेच चारही पानांचे थर पूर्ण करावेत.
आता खालच्या बाजुने गुंडाळी करत जावी.गुंडाळताना प्रत्येक वेळी मिश्रण थोडे लावत जावे.
आता हे तयार झालेले रोल वाफ़ेवर उकडुन घ्यावेत.आणि गार झाल्यावर त्याच्या चकत्या कापून त्या तेला मध्ये तळून घ्याव्यात. ज्यांना तळलेले आवडत नाही शांसाठी ह्या वड्या शॅलो फ़्राय ही करुन खाता येतील.
तयार वड्यांवर कोथिंबीर, ओले खोबरे घालून मस्त सजवावी.
टीपअळूची पाने खुप मोठी असली तर ३ च घ्यावीत आणि सर्व प्रथम मोठे पान खाली घ्यावे त्या नंतर मध्यम व वर छोटे घ्यावे असा क्रम केल्याने नंतर वळकटीची घडी नीट बांधता येते, आणि तळताना ती सुटत ही नाही.



Monday 19 August 2013

पुणेरी पाटी – पुणेरी पाट्या (Puneri Pati – Puneri Patya) भाग २ - Faltupana.in

पुणेरी पाटी – पुणेरी पाट्या (Puneri Pati – Puneri Patya) भाग २ - Faltupana.in

आचार्य अत्रे ह्यांचे १ से एक किस्से - Acharya Atre - Faltupana.in

आचार्य अत्रे ह्यांचे १ से एक किस्से - Acharya Atre - Faltupana.in

चवळीची भजी


साहित्य : आदल्या रात्री १ वाटी चवळी भिजत घाला, चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या,१ छोटा चमचा मीठ, बारीक 

चिरलेली कोथिंबीर,जिरेपूड,लिंबाचा रस,बेसनाचे पीठ(आवश्यकतेनुसार),तळणीसाठी तेल

कृती : प्रथम आदल्या रात्री भिजत टाकलेली चवळी मिक्सरमधून वाटून घ्या (भरड ठेऊन) ,नंतर त्यात 

चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या,१ छोटा चमचा मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर,जिरेपूड,लिंबाचा रस,बेसनाचे 

पीठ(आवश्यकतेनुसार) घालून भज्या साठी लागते तसे सरबरीत भिजवून घा. कढईत भाजी टाळण्यासाठी तेल

घालून चांगले तापल्यावर मंद आचेवर भाजी लालसर रंगावर तळून घ्या .


Sunday 18 August 2013

भरली वांगी (Stuffed Brinjal - मसाला वांगी)



साहित्य:
५ - ६ छोटी काटेरी जांभळी भाजीची वांगी, अर्धी वाटी सुके किसलेले गोटा खोबरे,१०-१२ लसूण पाकळ्या, एक मोठा बारीक चिरलेला कांदा,भाजलेले पांढरे तीळ दोन चमचे,शेंगदाण्याचे कूट चार चमचे,जिरे पूड एक चमचा,कांदा-लसूण मसाला दोन मोठे चमचे, चवीनुसार चिंच चटणी,साखर,बारीक चिरून गूळ,मीठ,लाल तिखट,फोडणीचे सामान- हळद,मोहरी,हिंग,जिरे,मेथीची पूड इ. व अर्धी वाटी तेल 
कृती:
१. प्रथम वांगी धुवून  देठाच्या विरुद्ध बाजूने मसाला भरण्यासाठी + असे दोन काप घेऊन चिरून घ्यावीत.
भरण्यासाठी मसाला:
२.एका ताटात बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यावर लाल तिखट,साखर,गूळ,चीचेची चटणीकांदा-लसूण मसालाबारीक चिरलेली कोथिंबीरबारीक किसलेलं खोबरं ,जिरे – धने पावडर,भाजलेले पांढरे तीळ व,शेंगदाण्याचे कूट एकत्र करून त्यावर दोन मोठे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून कालवून मसाला तयार करावा.
३. हा मसाला वांग्यात दाबून भरून घ्यावा व उरलेला मसाला बाजूला ठेवावा. .
४. कढईत तेल गरम करून त्यात जिरेमोहरीहळद,मेथी पावडर,लसूण पाकळ्या टाकावयात.
५. भरलेली वांगी या फोडणीत घालूनहलक्या हाताने परतून घ्यावीत.

६. उरलेलं मिश्रण घालून एक दणदणीत वाफ येवू द्यावी.
७. आता मीठ घालून पुन्हा हलक्या हाताने परतवून घ्यावे.
८.रसासाठी पुरेसे पाणी घालून घट्ट रस करून भाजी करावी.

Saturday 17 August 2013

व्हेज मांच्युरियन


साहित्य : २ वाट्या कोबी बारीक चिरून, २ वाट्या गाजर बारीक चिरून, २ वाटी श्रावण घेवडा (फरसबी) बारीक चिरून,वाट्या ढोबळी मिरची बारीक चिरून, १ हिरवी मिरची बारीक चिरून, ३ चमचे कॉर्न फ्लॉवर, ५ चमचे मैदा, १ चमचा आले-लसूण पेस्ट, २ लसूण पाकळ्या,वाटी कांद्याची पात, १/४ वाटी स्वीट चिली सॉस, १/४ वाटी सोया सॉस, २ चमचे हॉट चिली सॉस, चवीपुरते मीठ तेल
कृती : प्रथम बारीक चिरलेल्या कोबी, गाजर, ढोबळी मिरची, श्रावण घेवडा आणि हिरवी मिरची हया सर्वांमध्ये मीठ घालुन सर्व नीट मिक्स करून घेवून  बाजूला ठेवणे.
त्यात आले-णाची पेस्ट, ४ चमचे मैदा आणि २ चमचे कॉर्न फ्लॉवर घालुन मळणे.
ह्या पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून, उरलेल्या मैद्यात घोळवून तेलात मध्यम आचेवर टाळून घ्यावेत.
कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले लसूण, आणि कांद्याच्या पतीमधील कांदा घालुन गुलाबी रंगावर परतवून घ्या.त्यात स्वीट चिली सॉस, हॉट चिली सॉस आणि सोय सॉस घालुन नीट ढवळा.
३ वाटी पाण्यात १ चमचा कॉर्न फ्लॉवर घालुन चांगले ढवळा व ते मिश्रण वरच्या उकळत्या मिश्रणात घालुन ढवळणे.
त्यात आधी तळलेले मन्चुरिअनचे गोळे टाकून २-३ मिनिटे उकळी काढणे. कांद्याची पात बारीक चिरून घालुन वाढणे.


टीप:- मी नेहमी चिरलेल्या भाजीत मीठ घालुन ५ मिनिट बाजूला ठेवतो त्यामुळे त्याला सुटलेल्या पाण्यात पीठ मळता येते व नंतर पीठ सैल होत नाही
स्वीट सॉस आणि हॉट सॉसच्या ऎवजी मी ३ चमचे चिली फ्लेक्स, १/४ वाटी व्हिनेगर आणि २ चमचे साखर पण वापरली आहे.



Friday 16 August 2013

शेवग्याच्या पानांची भाजी


साहित्य : दोन वाट्या शेवग्याची कोवळी पाने,अर्धी वाटी मुगाची डाळ,१ मोठ्ठा कांदा,कढीपत्ता,हिरव्या मिरच्या,हळद,जिरे,हिंग,मोहोरी,१-२ आमसुले,मीठ,फोडणीसाठी तेल
कृती : अर्धी वाटी मूग डाळ १ तास आगोदर पाण्यात भिजत घालावी.१ मोठ्ठा कांदा बारीक चिरून घ्यावा. कढईत फोडणीसाठी तेल तापत ठेऊन चांगले तापल्यावरच त्यात कढीपत्ता,हिरव्या मिर्च्यांचे तुकडे,मोहरी,जिरे,हिंग व हळद घालून फोडणी करुन त्यात बारीक चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतवून घ्या.मग त्यात भिजवलेली मुगाची डाळ टाकून वाफ काढून शिजवून घ्या. डाळ चांगली शिजल्यावर त्यात शेवग्याची कोवळी पाने, १-२ आमसुले व चवीपुरते मीठ घालून पुन्हा एकदा वाफेवर शिजवून घ्या.
पोळी किंवा भाकरीबरोबर सर्व्ह करा.सोबत लसणाची किंवा शेंगदाण्याची चटणी द्या.