मालपोवा
साहित्य : १ वाटी साखर. १.५ वाटी चाळलेली कणीक. ४ मोठे चमचे दही, १०-१५ नग गव्हाचे
पोहे,दूध,पाणी
कृती : एका
पातेल्यात १/२ दूध
व १/२ पाणी घ्या, त्यात दही,साखर घाला व मिश्रण चांगले फेटून घ्या व नंतर त्यात चाळलेली कणीक घालून डोशासारखे
सरबरीत होईल असे बघा व हलके होण्यासाठी रूबवून घेऊन नंतर त्यात १०-१५ नग गव्हाचे
पोहे घाला व पीठ चांगले फुगून वर येण्यासाठी पातेले २-२.५ तास ताटाने झाकून
ठेवा.
कढईत तेल घालून मध्यम आंचेवर उकळे पर्यंत गरम करून घ्या व गरम तेलात एका
मोठ्या डावाने पीठ गोलाकाऱ ५-६ इंच आकारात पुरी प्रमाणे टाका. विशेष म्हणजे तो गोल
गोळा प्रथम कढईच्या तळाला जाईल व नंतर गोल पुरी सारखा होऊन वर तेलाच्या पृष्ठभागी
येईल.सोनेरी रंगावर तळून घ्या व चाळणीत काढून घेऊन निथळून घ्या.
पिस्ते व क्रीम घालून सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment