Monday 26 August 2013

दुधी हलवा

दुधी  हलवा


साहित्य : कोवळा दुधी भोपळा १ किलो,दूध १ लीटर,ताजा खवा ५०० ग्राम,साखर ५०० ग्राम,वेलदोडयाची पूड १ चमचा,अमूल दुधाची पावडर १०० ग्राम,काजू-बदाम-बेदाणे-प्रत्येकी २५ ग्राम व साजूक तूप २ चमचे

कृती : प्रथम दुधी भोपळा स्वच्छ धुवून व पुसून साले काढून किसणीवर त्यांचा कीस काढून घ्या.आता एका जाड बुडाच्या मोठ्या पातेल्यात २ चमचे साजूक तूप घालून दुधीचा कीस पूर्ण कोरडा होईपर्यंत परतून घ्या.मग त्यात आधी खरपूस परतून घेतलेला खवा घाला व दोन्ही चांगले एकजीव झाल्यावर अमूलची दूध पावडर,दूध,साखर व वेलदोडयाची पावडर घाला व मंद आचेवर शिजायला ठेवा.शिजून हलवा घट्ट होऊ लागल्यावर गॅस बंद करून त्यात बारीक तुकडे केलेली ड्राय फ्रूट्स (काजू,बदाम,बेदाणे इये.)घालून हलवा व एका काचेच्या बाउलमध्ये काढून घेऊन सेट होण्यासाठी अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा.
सर्व्ह करतेवेळी वरुन थोडे ड्राय फ्रूटचे तुकडे घालून द्या.

No comments:

Post a Comment