पालक-बटाटा कटलेट.
साहित्य : - ४/५ बटाटे,पालक,आले-लसूण पेस्ट,हिरवी मिरची,खसखस,पांढरे
तीळ,२/३ ब्रेड स्लाईस,चाट मसाला (पाहिजे असल्यास)मीठ,जिरे-धने पूड,बारीक रवा व तेल
कृती : - प्रथम बटाटे उकडून घ्यायचे.उकडलेले बटाटे गरम असताना किसून घ्यायचे.त्यात पालक चिरून घालायचा.नंतर
लसूण-मिरची बारीक वाटायची आणि ती त्या मिश्रणात घालायची.पाहिजे असल्यास चाट मसाला
घालायचा.शिळा ब्रेड बारीक करून तो पण पालक-बटाट्याच्या मिश्रणात घालायचा.जिरेपूड,धनेपूड,बारीक बारीक करून तो पण पालक-बटाट्याच्या मिश्रणात
घालायचा.जिरेपूड,धनेपूड,बारीक
चिरलेली कोथिंबीर चवीनुसार मिरचीचा ठेचा,साखर,लिंबाचा रस व मीठ घालून एकजीव मळून
घ्यायचे आणि आपल्याला हव्या त्या आकाराचे कटलेट बनवायचे.आणि बारीक रवा लाऊन तव्यावर थोडेसे
तेल सोडून फ्राय करायचे.ब्रेड घातल्याने खुसखुशीत लागतात.पालक
नसेल तर दुसरी कोणतीही भाजी घालू शकतो.लहान मुले आवडीने खातात आणि मुख्य म्हणजे
त्यांच्या पोटात सर्व भाज्या जातात.चटणी/टोमॅटो केचप बरोबर छान लागतात.
No comments:
Post a Comment