साहित्य : कोवळ्या काकड्या ५ – ६ नग ,
बारीक रवा १ वाटी , गोड दही १ मोठा चमचा , लसूण ४ – ५ पाकळ्या , मीठ व मिरच्या चवीपुरत्या , तेल ,सॉस
कृती : काकड्यांची साले काढून घ्या व किसणीवर किसून घ्या , १ मोठा चमचा दहयात चवीपुरते मिरर्च्यांचे तुकडे,मीठ व ४-५ लसूण पाकळ्यांचे तुकडे घालून मिक्सर मधुन फिरवून घ्या व ते वाटण
आणि १ वाटी रवा असे काकडीच्या किसात घालून सर्व एकजीव होईपर्यंत मिक्स करून त्यात
जरुरीपुरते पाणी घालून १ तास झाकून ठेवा.गॅसवर तवा तापत ठेवा व चांगला तापल्यावर
त्यावर थोडे मिठाचे पाणी टाकून अर्धा
चिरलेला कांदा त्यावर फिरवा.नंतर तव्यावर चमचाभर तेल घालून कांद्याने सर्व तव्यावर
पसरून घ्या व त्यावर रवा-काकडीचे मिश्रणाचे घावन घाला. थोड्या वेळाने उलटून घ्या व
दुसर्या बाजूने तयार करून घ्या. तयार घावन दिशमधून सॉस बरोबर सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment