Search This Blog

Saturday, 24 August 2013

उपवासाची साबूदाण्याची खिचडी

उपवासाची साबूदाण्याची खिचडी 



साहित्य : १ वाटी चांगल्या प्रतीचा साबुदाणा, १ मूठभर शेंगदाण्याचे भरड कूट, १ मध्यम आकाराचा बटाटा (कच्चा किंवा उकडलेला कसाही चालेल), १-२ हिरव्या मिरच्या तुकडे करून, पाउण ते १ चमचा लाल तिखट, १ चमचा जिरे, साजूक तूप/तेल ५-६ चमचे, मीठ, साखर, अर्धी मूठ चिरलेली कोथिंबीर व २-३ चमचे खवलेला ओला नारळ
कृती : साबुदाणा पाण्याने धुवून २-३ तास भिजत घालावा.पाणी पूर्ण काढून घेऊन व थोडेसे दूध घाला  म्हणजे जास्त चांगला भिजेल. कच्चा बटाट्याची साले काढून त्याचे काचऱ्या चिरतो तसे पातळ काप करून मिठाच्या पाण्यामध्ये घाला.(किंवा उकडलेल्या बटाट्याच्या फोडी करून घ्या) गॅसवर मध्यम आचेवर कढई ठेवा. त्यात तेल/साजूक तूप घालून ते पूरेसे तापले म्हणजे त्यात जिरे घाला, ते तडतडले की त्यात हिरव्या मिरच्यांचे चिरलेले तुकडे घाला व पातळ चिरलेले
कच्या बटाट्याचे काप घाला .(किंवा उकडलेल्या बटाट्याच्या फोडी घाला) पुन्हा परता. कच्या बटात्याचे काप घालताना त्यातले मिठाचे पाणी काढून टाका. त्यावर १-२ मिनिटे झाकण ठेवून बटाटे वाफवून घ्या. ते शिजले की त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर व खवलेला ओल्या नारळाचा चव घालून पुन्हा परता. आता गॅस मंद करा. त्यात थोडेसे मीठ पेरून परत थोडे परता. आता भिजवलेला साबुदाणा आहे तो हाताने मोकळा करून घ्या. त्यात लाल तिखट,चवीप्रमाणे मीठ, अर्धा चमचा साखर व शेंगदाण्याचे भरड कूट घालून चांगले मिसळून घ्या. व हे मिश्रण कढईत घालून उलथण्याने सगळीकडून खिचडी चांगली ढवळा. नंतर त्यावर झाकणात थोडे पाणी घालून झाकून ठेवून १-२ मिनिटे वाफवून घ्या. असे एक दोन वेळा करा, म्हणजे साबुदाणा चांगला शिजेल व त्याचा रंगही बदलेल. कालथ्याने खिचडी परत परत व्यवस्थित ढवळा म्हणजे मोकळी होईल. गोळा होणार नाही. तेल/तूप कमी वाटले तर वरून थोडे घालून ढवळणे.
साबुदाणा भिजवल्यावर दर अर्ध्या तासाने मोकळा करून घ्या. दोन बोटांच्या चिमटीत साबुदाणा धरून तो व्यवस्थित भिजला आहे ना याची खात्री करून घ्या. भिजला नसेल तर थोडासा पाण्याचा हबका मारून त्यावर परत झाकण ठेवा.
टीप ; साजूक तूपातील खिचडी सर्वात जास्त चविष्ट होते.

No comments:

Post a Comment