साहित्य:
५ - ६ छोटी काटेरी जांभळी भाजीची वांगी, अर्धी वाटी सुके किसलेले गोटा खोबरे,१०-१२ लसूण पाकळ्या, एक मोठा बारीक चिरलेला कांदा,भाजलेले पांढरे तीळ दोन चमचे,शेंगदाण्याचे कूट चार
चमचे,जिरे पूड एक चमचा,कांदा-लसूण
मसाला दोन मोठे चमचे, चवीनुसार चिंच चटणी,साखर,बारीक चिरून गूळ,मीठ,लाल तिखट,फोडणीचे सामान- हळद,मोहरी,हिंग,जिरे,मेथीची पूड इ. व
अर्धी वाटी तेल
कृती:
१. प्रथम वांगी धुवून देठाच्या विरुद्ध बाजूने मसाला भरण्यासाठी + असे दोन काप घेऊन चिरून घ्यावीत.
भरण्यासाठी मसाला:
२.एका ताटात बारीक चिरलेला कांदा घेऊन त्यावर लाल तिखट,साखर,गूळ,चीचेची चटणी, कांदा-लसूण मसाला, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक किसलेलं खोबरं ,जिरे – धने पावडर,भाजलेले पांढरे तीळ व,शेंगदाण्याचे कूट एकत्र करून त्यावर दोन मोठे चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून कालवून मसाला तयार करावा.

३. हा मसाला वांग्यात दाबून भरून घ्यावा व उरलेला मसाला बाजूला ठेवावा. .
४. कढईत तेल गरम करून त्यात जिरे, मोहरी, हळद,मेथी पावडर,लसूण पाकळ्या टाकावयात.
५. भरलेली वांगी या फोडणीत घालून, हलक्या हाताने परतून घ्यावीत.
६. उरलेलं मिश्रण घालून एक दणदणीत वाफ येवू द्यावी.
७. आता मीठ घालून पुन्हा हलक्या हाताने परतवून घ्यावे.
८.रसासाठी पुरेसे पाणी घालून घट्ट रस करून भाजी करावी.
No comments:
Post a Comment