Sunday 25 August 2013

सुरळीच्या वड्या

सुरळीच्या वड्या




साहित्य : १ वाटी चणा डाळीचे पीठ (बेसन),१ वाटी आंबट ताक,१ वाटी पाणी,चवीसाठी मीठ व लाल तिखट,थोडी हळद,फोडणीसाठी तेल,हिंग व मोहरी व वरुन सजावटीसाठी  नारळाचा चव (खोवलेला नारळ),बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती : प्रथम एका पातेल्यात बेसन,आंबट ताक व पाणी एकत्र करून ढवळून घ्यावे व पातेले गॅसवर ठेवावे त्यात थोडी हळद व चवीनुसार मीठ व लाल तिखट घालून शिजवून घ्यावे. शिजत असताना एकसारखे (न थांबता) ढवळत रहावे व गुठळी होऊ देऊ नये.मिश्रण चांगले शिजले की गरम असतानाच एका स्टीलच्या थाळ्याला मागील बाजूस तेलाचे हलके बोट फिरवून त्यावर  तेलाच्या हातानेच पातळ पसरावे व थंड होऊ द्यावे.
गार झाल्यावर त्याची गुंडाळून सुरळी करून त्याचे ३/४” मापाचे कापून तुकडे करून एका पसरट ताटात किंवा डिशमध्ये काढून घ्या व त्यावर फोडणी, नारळाचा चव व बारीक चिरलेली कोथिंबीर घाला व एका छोट्या बशीतू अगर बाऊल मधून सर्व्ह करा. 

No comments:

Post a Comment