"गोपाळ काला "
साहित्य : १ वाटी
जाड पोहे , १ वाटी ज्वारीच्या लाहया , अर्धी वाटी चुरमुरे , १ वाटी ओल्या नारळाचा खोवलेला
चव , साले काढून व बारीक चिरलेले काकडीचे तुकडे १ वाटी , हिरव्या दोन
मिरचयाचे बारीक तुकडे , एका बारीक तुकडा आल्याचा कीस , १ चमचा जिरे, दोन कप दही ,
अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर , चविसाठी साखर व मीठ व
फोडणीसाठी एक मोठा चमचा साजूक तूप.
कृती : सर्वात प्रथम पोहे पाणी घालून
५-१० मिनिटे भिजवून घ्या॰ नंतर एक मोठे पातेले घेऊन त्यात हे भिजलेले पोहे घेऊन
त्यात लाहया,चुरमुरे,ओल्या
नारळाचा चव.बारीक चिरलेले काकडीचे तुकडे,दही,बारीक चिरलेली कोथिंबीर,चवीपुरती साखर व मीठ घालून
सर्व चांगले एकत्र कालवा. नातर एका
पॅनमध्ये साजूक तूप घालून गरळ झाल्यावर त्यात जिरे ,आल्याचा
कीस व हिरव्या मिरचयांचे तुकडे घालून फोडणी / तडका करून तो ह्या मिश्रणावर घालून
चांगले हलवून घ्या,
हा काला सर्वांनी मिळून गोकुळ अष्टमीचा प्रसाद
म्हणून खायचा असतो व तो लागतोही फारच चविष्ट !!!
No comments:
Post a Comment