मसाले भात
साहित्य
१ वाटी बासमती तांदूळ,१/४ वाटी दही,१/२ वाटी उभी चिरलेली तोंडली,५-६ श्रावण घेवाड्याच्या लांब चिरलेल्या शेंगा,४-५ फ्लॉवरचे तुरे,वांग्याचे काप किंवा फोडी , एक बटाटा फोडी करून ,एक कांदा उभा चिरून (काप),१/४ वाटी ताजा हिरवा मटार,१/२ वाटी कोथिंबीर,१/२ वाटी किसलेले ओले खोबरे,१/२ चमचा लाल तिखट,१/२ चमचा गोडा मसाला,८-९ काजू पाकळ्या ,दोन मसाला वेलदोडे , २ लवंगा,१ दालचिनी,५-६ कढी पत्ता पाने ,१/४ चमचा मोहोरी, चिमुटभर हिंग,१ चमचा साजूक तूप,चवीप्रमाणे मीठ

कृती
चाळणीतून तांदूळ स्वच्छ धुवून घ्यावेत व पाणी
निथळून घ्यावे ,त्यात लाल तिखट, गोडा मसाला,
घट्ट मलाईचे दही
घालुन १५ मिनिटे मुरत ठेवणे॰
प्रेशर कुकरमध्ये साजूक तूप घालुन
त्यात हळद,जिरे व मोहोरीची फोडणी करुन घ्यावी व त्यात हिंग,
कढीपत्ता, दालचिनी,मसाल्याचे
वेलदोडे आणि काजूच्या पाकळ्या घालुन एक दोन मिनिट परतणे,नंतर
त्यात उभी चिरलेली तोंडली, श्रावण घेवडा,फ्लॉवर,वांग्याचे
काप,बटाट्याच्या फोडी,कांद्याचे काप घालुन
अजून दोन मिनिटे परतून घेऊन मग त्यात धुतलेले तांदूळ, हिरवा मटार
आणि मीठ घालुन दोन मिनिट परतणे.नंतर त्यात २ वाट्या पाणी घालुन कुकरचे झाकण लावून चार
शिट्ट्या काढणे.
वाढतेवेळी मसाले भातावर ओले खोबरे
व बारीक कोथिंबीर आणि त्यावर साजूक तूप
सोडून देणे.
No comments:
Post a Comment