Saturday 17 August 2013

व्हेज मांच्युरियन


साहित्य : २ वाट्या कोबी बारीक चिरून, २ वाट्या गाजर बारीक चिरून, २ वाटी श्रावण घेवडा (फरसबी) बारीक चिरून,वाट्या ढोबळी मिरची बारीक चिरून, १ हिरवी मिरची बारीक चिरून, ३ चमचे कॉर्न फ्लॉवर, ५ चमचे मैदा, १ चमचा आले-लसूण पेस्ट, २ लसूण पाकळ्या,वाटी कांद्याची पात, १/४ वाटी स्वीट चिली सॉस, १/४ वाटी सोया सॉस, २ चमचे हॉट चिली सॉस, चवीपुरते मीठ तेल
कृती : प्रथम बारीक चिरलेल्या कोबी, गाजर, ढोबळी मिरची, श्रावण घेवडा आणि हिरवी मिरची हया सर्वांमध्ये मीठ घालुन सर्व नीट मिक्स करून घेवून  बाजूला ठेवणे.
त्यात आले-णाची पेस्ट, ४ चमचे मैदा आणि २ चमचे कॉर्न फ्लॉवर घालुन मळणे.
ह्या पीठाचे छोटे छोटे गोळे बनवून, उरलेल्या मैद्यात घोळवून तेलात मध्यम आचेवर टाळून घ्यावेत.
कढईत थोडे तेल गरम करून त्यात बारीक चिरलेले लसूण, आणि कांद्याच्या पतीमधील कांदा घालुन गुलाबी रंगावर परतवून घ्या.त्यात स्वीट चिली सॉस, हॉट चिली सॉस आणि सोय सॉस घालुन नीट ढवळा.
३ वाटी पाण्यात १ चमचा कॉर्न फ्लॉवर घालुन चांगले ढवळा व ते मिश्रण वरच्या उकळत्या मिश्रणात घालुन ढवळणे.
त्यात आधी तळलेले मन्चुरिअनचे गोळे टाकून २-३ मिनिटे उकळी काढणे. कांद्याची पात बारीक चिरून घालुन वाढणे.


टीप:- मी नेहमी चिरलेल्या भाजीत मीठ घालुन ५ मिनिट बाजूला ठेवतो त्यामुळे त्याला सुटलेल्या पाण्यात पीठ मळता येते व नंतर पीठ सैल होत नाही
स्वीट सॉस आणि हॉट सॉसच्या ऎवजी मी ३ चमचे चिली फ्लेक्स, १/४ वाटी व्हिनेगर आणि २ चमचे साखर पण वापरली आहे.



No comments:

Post a Comment