Search This Blog

Tuesday, 27 August 2013

चिरोटे

चिरोटे 


साहित्य : २ वाट्या चाळलेला मैदा,पाव वाटी बारीक रवा,अर्धा चमचा मीठ,१ मोठा चमचा वनस्पती तूप   (मोहनसाठी) , १ मोठा चमचा दही,व पीठ भिजवण्यासाठी जरुरीपुरते थोडेसे दूध

 साठा तयार करण्यासाठी साहित्य : २ चमचे वनस्पती तूप (साजूक नको) व २ चमचे तांदळाची पिठी  अथवा  कॉर्नफ्लॉअर  

  
    पाक करण्यासाठी साहित्य : दिड वाटी साखर व ती बुडेपर्यंत पाणी, अर्ध्या लिंबाचा रस,  वेलदोडयाची पूड                                                                                                                              
कृती : एक मोठा स्टीलचा थाळा घ्या व त्यात वनस्पती तूप घालून चांगले फेटा,त्यात तांदळाची पिठी किंवा कॉर्नफ्लौअर घालून पुन्हा फेटा.हा झाला साठा.आता एक जाड बुडाचे स्टीलचे पातेले घ्या व त्यात साखर व ती बुडेल एव्हढे पाणी घालून पातेले गॅसवर ठेवा व डावाने एकसारखे हलवत रहा.साखर विरघळून उकळी आल्यावर घट्टसर पाक होऊ द्या.लाडवाप्रमाणे दोनतारी पाक झाल्यावर गॅस बंद करावा व गार होईपर्यंत दवाने धावलात राहावे.पाक जरा गार झाल्यावर त्यात वेलदोड्याची पूड व अर्ध्या लिंबाचा रस घालून ढवळा.एका परातीत मैदा,बारीक रवा,पातळ गरम वनस्पती तूप,मीठव दही घेवून ते सर्व मैदयास चोळून लावावे व जरुरीपुरते दूध घालून भिजवून घट्ट गोळा करा व १५-२० मिनिटे झाकून ठेवा व नंतरच चिरोटे करावयास घ्या.
प्रथम भिजवलेल्या गोळ्याचे तीन सारखे गोळे करून प्रत्येक गोळ्याची पोळपाटावर थोडीशी तांदळाची पिठी लावून पातळ पोळी लाटून घ्यावी.एक पोळी पोळपाटावर ठेवून त्यावर तयार केलेले साटे सगळीकडे सारखे लावून घ्यावे व त्यावर दुसरी पोळी ठेवून पुन्हा सगळीकडे सारखे साटे लावून त्यावर तिसरी पोळी ठेवावी व उरलेले साटे सगळीकडे लावून गुंडाळी करावी व सुरीने सारख्या अंतरावर कापून लाट्या बनावाव्या.कापलेला भाग वर येईल अशी एकेक लाटी ठेवून पुरी सारखी लाटून घ्यावी. 

No comments:

Post a Comment