साहित्य: तांदुळाळाची पिठी- १ वाटी (पीठ रवाळ असावे, फार बारीक दळू नये ) आंबट ताक- एक वाटी पाणी- पीठ सरसरीत होईल इतपत अंदाजे 2 वाट्या
लसुण पाकळ्या - ३ ते ४ जीरे- १ चमचा हिरव्या मिरच्या- २ मीठ चवीनुसार तेल- आवश्यकतेनुसार कृती: मिरच्या, लसुण आणि जीरे खडबडीत वाटून घ्यावी. फार तिखट आवडत नसेल तर मिरची न वाटता त्याचे छोटे छोटे तुकडे करून घ्यावेत. म्हणजे सहज बाजूला काढता येतील. पीठ, लसून-मिरचीचा ठेचा, ताक, जरुरीनुसार पाणी आणि मीठ एकत्र करून छान ढवळून घ्यावे. सर्व गुठळ्या मोडून काढाव्यात. नॉन-स्टीक डोसा तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल पसरून घ्यावे. पळीभर मिश्रण घेऊन तव्याच्या कडेपासून मध्यापर्यंत ओतावे. झाकण ठेऊन २-३ मिनिटे शिजवावे. नंतर उलटून पुन्हा २-३ मिनिटे भाजावे. गरम गरम टोमाटो केचप सोबत वाढावे अथवा नुसतेच खावे.
No comments:
Post a Comment