Search This Blog

Wednesday, 14 August 2013

मसाला भरली कारली


                                    

साहित्य : ताजी कारली २५० ग्राम,कांदा बारीक चिरून,३-४ लसूण पाकळ्या बारीक चिरून, ३-४ चमचे शेंगदाण्याचे कूट,३-४ चमचे पांढरे तीळ खरपूस भाजून,२-३ चमचे चिंचेचा कोळ किंवा चटणी,२-३ चमचे गोडा मसाला,२ चमचे लाल तिखट,थोडीशी हळद,हिंग,चवीपुरती साखर अथवा गूळ व मीठ,२-३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन आणि फोडणीसाठी तेल व इतर फोडणीचे साहित्य
कृती : दोन्ही बाजूचे देठ कापून टाका व कारल्याचे तीन तुकडे करा व प्रत्येक तुकडयास आडवा-उभा छेद घेऊन चार भाग करा,आतल्या बिया काढून टाका व कारल्यास आतून चांगले चोळून मीठ लावून एका ताटात झाकून ठेवा.दुसर्‍या ताटात बारीक चिरलेरला कांदा, बारीक चिरलेरल्या लसूण पाकळ्या, पांढरे तीळ, गोडा मसाला, लाल तिखट, थोडीशी हळद व हिंग,चवीपुरती साखर अथवा गूळ व मीठ,२-३ चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून चांगले मिसळून घ्या व मसाला तयार करून ठेवा.
आता हा मसाला प्रत्येक कारल्याच्या फोडीत चांगला दाबून भरा.   

No comments:

Post a Comment