Thursday 28 March 2019

शिळ्या पोळीचे डोसे

वेस्ट पासून बेस्ट तेही झटपट आणि मस्त
शिळ्या पोळीचे डोसे



साहित्य : दोन शिळ्या (आदल्या रात्रीच्या) पोळ्या,दोन टेबल स्पून बारीक रवा,मूठभर जाड पोहे,अर्धी वाटी दही,४ लसणाच्या पाकळ्या बारीक चिरून,कांदा व लसूण पात दोन्ही बारीक चिरून,चवीनुसार हिरव्या मिरचीचा ठेचा,मीठ, कोथिंबीर,आवश्यकतेनुसार तेल
कृती : मिक्सरच्या मोठ्या भांड्यात पोळ्या ,रवा,दही,जाड पोहे,लसणाच्या पाकळ्याचे तुकडे,चिरलेली कांदा व लसूण पात, हिरव्या मिरचीचा ठेचा,मीठ व कोथिंबीर घालून मिक्सरवर थोडे थोडे पाणी घालून वाटून घ्या. मिश्रण डोश्यांच्या पिठाएव्हढे सैलसर सरबरीत बनवून ठेवा. गॅसवर डोश्यांचा तवा तापत ठेवा. तवा तापल्यावर तेल घालून डोसे टाका व दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून घ्या.
गरम डोसे चटणी व सांबार सोबत सर्व्ह करा.