Search This Blog

Saturday, 9 March 2019

कांदा शेंगदाणे चटणी



कांदा शेंगदाणे चटणी

आधी शेंगदाणे भट्टीवर भाजून आणायचे व त्यांचे खलबत्यात जाडसर कुट करायचे. कांदा बारीक चिरुन घ्यायचा. 
कढाईत कांदा तेलामध्ये भाजून घेऊन त्यात सोलापुरी काळं  तिखट, खलबत्यात केलेलं शेंगदाण्याचे  कुट व चवीनुसार मीठ घालून परतुन घ्यायचं. मग त्यात कोथंबिर बारीक करुन घालायची. 
झाली शेंगदाना चटणी तयार...
जास्त तिखट हवं असल्यास हिरवी मिरची बारीक करुन वापरु शकता.
आपल्याला नक्कीच आवडेल खायला अशी कांदा घालून केलेली शेंगदाण्याची चटणी आणि सोबत भाकरी.

No comments:

Post a Comment