Search This Blog

Saturday, 9 March 2019

उपवासाचा आलु छेला


उपवासाचा आलु छेला

साहित्य : मोठा बटाटा, दोन टेबलस्पून  वरीच्या तांदूळाची (भगरचे) पीठ ,एक टेबलस्पून साबुदाणा  पीठ,चवीनुसार हिरव्या मिरचीची पेस्ट आणि मीठ,अर्धा चमचा जिरे,दोन टेबलस्पून शेंगदाण्याचे कूट,
कृती : कच्च्या बटाट्याची  सालं काढुन तो किसणीवर किसुन घ्यावा व पांच मिनिटे मिठाच्या  पाण्यात घालून  ठेवा. पांच मिनिटांनी हाताने किसातील पाणी पिळून काढा व  किस एका बाऊलमध्ये घ्या.
या बटाट्याच्या किसामध्ये भगरीचे पीठ, साबूदाण्याचे पीठ,चवीनुसार हिरव्या मिरचीची  पेस्ट आणि  मीठ, जिरे, शेंगदाण्याचे कूट  घालून नीट मिक्स करा.
आता गॅसवर डोश्याचा तवा गरम करून त्यावर तेल घालून डावेने मिश्रण घाला व जाडसर पसरवा.
वरून तेल सोडून दोन्ही बाजूनी छेला भाजून घ्या.
गरमा गरम उपवासाचा आलु छेला चटणी, दही सोबत सर्व्ह करा.


No comments:

Post a Comment