साहित्य: ४-५ वाट्या कलिंगडाच्या
मध्यम आकाराच्या फोडी (बिया काढून टाकाव्यात) , अर्धी वाटी संत्र्याचा ज्यूस
(आवडीप्रमाणे कमी जास्त करावा ,संत्र्यातीलही
बिया काढून टाकाव्यात),अर्धा
चमचा सैंधव (काळं) मीठ,अर्धा चमचा आल्याचा कीस,एक छोटा चमचा चाट मसाला,बर्फाचे तुकडे (ऐच्छिक)
कृती : मिसरच्या ब्लेंडरच्या भांड्यात कलिंगडाच्या बारीक फोडी,संत्र्याचा ज्यूस, काळं सैंधव मीठ, आल्याचा कीस व चाट मसाला घालून मिक्सरवर फिरवून ब्लेंड करावे. एकजीव झाले
कि सर्व्हिंग बाउळ्स किंवा ग्लास मध्ये बर्फाचे तुकडे घालून त्यावर ज्यूस ओतावा.
आणि गारच सर्व्ह करावा.
टीप
: सर्व्ह करतेवेळी ज्यूसमध्ये सजावटीसाठी कलिंगडाचे बारीक तुकडे वरून टाकावे.
No comments:
Post a Comment