Wednesday 27 March 2019

कारल्याचे वेफर्स

कारल्याचे वेफर्स


साहित्य : रसरशीत ताजी कार्ली २५०ग्राम,आवश्यकतेनुसार तळणीसाठी तेल,चाट मसाला,गरम मसाला, धने-जिरे पावडर चवीनुसार लाल तिखट व मीठ
कृती : प्रथम कारली स्वच्छ धुवून व कोरडी करून घ्या,दोन्ही बाजूंचे शेवटचे टोकाचा भाग कापून टाका,उरलेल्या कारल्याचे विळीवर अतिशय पात्तळ काप / चकत्या करून घ्या,बिया व मधला भाग काढून टाका. त्या चकत्याना मीठ,लाल तिखट, चाट मसाला,गरम मसाला, धने-जिरे पावडर चोळून १५-२० म्ंनिते मुरत ठेवा. (Marinate)
आता गॅसवर एका कढईत तेल तापवून घेऊन त्यात हे मसाल्यात मुरवलेले पात्तळ काप टाकून परतून  घ्या. झाले हे कारल्याचे कुरकुरीत वेफर्स खाण्यासाठी तय्यार !
खास करून ज्यांना मधुमेह आहे त्यांच्या साठी हे वेफर्स फारच आरोग्यदायी व उत्तम आहेत.

No comments:

Post a Comment