साहित्य : दोन वाट्या कढीपत्ता, एक वाटी फुटाण्याचे डाळे, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी किसलेले सुके खोबरे चवीनुसार
८-१० लाल सुक्या मिर्च्या व मीठ , एक चमचा जिरे,५-६ लसणाच्या पाकळ्या , पाव चमचा हळद, हिंग ,चिंचेचे बुटुक ,एक टेबलस्पून तेल
कृती : कढीपत्त्याची पाने धुवुन कोरडी करून घेऊन थोड्याशा तेलावर हिंग टाकुन तळून घ्यावीत, डाळे ,सुके खोबरे,जिरे अन तीळही त्याच कढईत भाजावे,लालसुक्या मिरच्या ,लसणाच्या पाकळ्या व मिठही परतुन घ्यावे. नंतर सर्व एकत्र करुन त्यात हळद,हिंग व चिंचेचे बुटुक घालून मिक्सरमध्ये वाटावे अन एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत भरावे.

ही कढीपत्त्याची चटणी आयत्यावेळी दह्यात कालवुन व फोडणी घालून छान लागते.किंवा
नुसत्या चटणीवर गरम लसणाची फोडणी घालूनही चपातीबरोबर खायला द्यावी.
No comments:
Post a Comment