Thursday 21 March 2019

मिठाचे विविध प्रकार


मिठाचे विविध प्रकार 
  • खडे मीठ - समुद्राच्या पाण्यापासून मिळवलेले नैसर्गिक सामुद्र मीठ. हे कुटले की साधे बारीक मीठ बनते.
  • साधे मीठ किंवा बारीक मीठ - हे खडे मिठापासून बनते. हे मॅग्नेशियम क्लोराईडचा थोडा अंश असलेले सोडियम क्लोराईड असते. याला हवेतील ओलाव्यामुळे पाणी सुटू शकते.
  • शेंदेलोण ऊर्फ सैंधव : याचे खडक असतात, म्हणून याला रॉक सॉल्ट म्हणतात.
  • पादेलोण ऊर्फ सौवर्चल (संचळ) मीठ. हे जमिनीतून मिळवले जाणारे खनिज आहे. पादेलोणाचे खडे असतात. याचा रंग फिकट गुलाबीसर असतो. ,
  • आयोडीनयुक्त मीठ - शरीराच्या थायरॉइड ग्रंथीमध्ये आयोडीन आवश्यक असते. आयोडीनच्या कमतरतेमुळे ही ग्रंथी सुजते, त्याला गलगंड असे म्हणतात. आयोडीनच्या कमतरतेमुळे माणसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो,[२] त्यासाठी मिठामध्ये अत्यल्प प्रमाणात (एक किलोग्रॅम मिठामध्ये ३० ते ५० मिलिग्रॅम आयोडीन, किंवा एक किलोग्रॅम सोडियम क्लोराईडमध्ये ५० ते ८४ मिलिग्रॅम पोटॅशियम आयोडेट) मिसळले जाते.
  • पोटॅशियम सॉल्ट : अधिक रक्तदाब असलेल्या रोग्यांना साधे मीठ खायला डॉक्टरांची परवानगी नसते त्यांना हे मीठ चालते.
  • टेबल सॉल्ट : अतिशव बारीक केलेले शुद्ध सोडियम क्लोराईड. याला हवेतील ओलाव्यानेसुद्धा पाणी सुटत नाही. हे जेवणाच्या मेजावर बारीक भोक असलेल्या कुप्यांमध्ये भरून ठेवलेले असते, आणि लागेल तेव्हा हातातल्या खाद्यपदार्थावर शिंपडता येते.
आयुर्वेदात या नेहमीच्या मिठाप्रमाणेच नैसर्गिक (जमीन उकरून मिळालेल्या खार्‍या पाण्यापासून मिळवलेले मीठ), बीड (बिडलोण), रोमक (जयपूरजवळच्या सांभर तलावातील पाण्यापासून बनलेले मीठ), पांसुज (fossil salt) वगैरे नावांची मिठे वापरली जातात.

No comments:

Post a Comment