साहित्य : दोन वाट्या दिल्ली राईस,चार वाट्या पाणी,एक छोटा चमचा हळद , एक जुड्डी स्वच्छ धुवून , निवडून व बारिक चिरलेली हिरवी मेथी ,एक मध्यम आकाराचा कांदा , ८-१० लसणाच्या पाकळ्या,चवीनुसार मीठ. जेनुसार
फोडणीसाठी साहित्य : एक छोटा चमचा मोहरी,एक छोटा चमचा जिरे ,चिमूटभर हींग एक छोटा चमचा हळद,७-८ कढीपत्त्याची पाने ,डावभर तेल.
मसाले : एक छोटा चमचा चमचा लाल मिरचीची पावडर ,एक छोटा चमचा गरम मसाला, एक छोटा चमचा जिरे पूड ,एक छोटा चमचा धणे पूड.
कृती :प्रथम तांदूळ स्वच्छ धुवून घ्या आणि अर्धा तास पाण्यात भिजत घालून ठेवा.
दुसरीकडे गॅसवर एका पॅनमध्ये पाणी उकळत ठेवा आणि पाण्याला उकळी आली की लगेचच मीठ व भिजवलेले तांदुळ घालून मोकळा भात बनवून घ्या.
आता गॅसवर एका जाड़ बुडाच्या पातेल्यात फोडणीसाठी तेल गरम करून त्यात मोहरी घाला ती तडतडली की लगेच जिरे,चिमूटभर हिंग व कढीपत्त्याची पाने घाला.नंतर लगेच उभा चिरलेला कांदा व लसणाच्या बारीक़ चिरलेल्या पाकळ्या घालून लाल होईपर्यंत परताव्या.
गुलाबीसार रंगावर कांदा परतून झाला की बारिक चिरलेली मेथी घालून तेल सुटेपर्यंत परतावी.
शेवटी शिजवलेला तयार भात घालून परतावे.पॅनवर
झाकण ठेवून मिनिटे मंद गॅसची आंच मंद ठेवून १०-१५ मिनिटे भात शिजू दयावा.
सर्विंग बाउल मध्ये शिजलेला भात काढून घेऊन त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर भुरभुरुन एखाद्या कोशिंबीरीसोबत सर्व्ह करा.
No comments:
Post a Comment