Search This Blog

Monday, 11 March 2019

कांदा मेथी


कांदा मेथी



साहित्य : एक टेबलस्पून मेथीचे दाणे,अर्धी जुड्डी  स्वच्छ धुवून,निवडून व चिरलेली मेथी, ४-५ मध्यम आकाराचे कांदे,एक टेबलस्पून तेल,एक चमचा मोहरी,अर्धा चमचा जिरे,अर्धा चमचा हळद,चिमूटभर हिंग,चिमूटभर साखर, अर्धा चमचा गारा मसाला,चवीनुसार तिखट आणि मीठ.
कृती :  एका बाउलमध्ये मेथीचे दाणे त्यावर पेरभर पाणी घालून रात्रभर  भिजत घालून ठेवावेत.
दुसरे दिवशी सकाळी गॅसवर एका पॅनमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घेऊन तेल चांगले तापल्यावर त्यात जिरे,मोहरी टाका व  दोन्ही चांगली तडतडली की अर्धा मिनिट परतून घेऊन मग त्यात हळद,हिंग,गरम मसाला व लाल तिखट घालून परतावे,नंतर चिरलेला कांदा घालून लालसर होईपर्यंत परतून घेऊन मग भिजत घातलेले मेथीचे दाणे व चिरलेली मेथी घालून मेथीचे दाणे लालसर रंगावर परतून घ्यावेत व मग त्यात चिमूटभर साखर घालून भाजी वाफेवर शिजू द्यावी. शेवटी भाजीत चवीनुसार मीठ व थोडेसे पाणी घालून एक उकळी काढून गॅस बंद करा.


No comments:

Post a Comment